ढगाळ वातावरणामुळे तुरीचे उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:26+5:302021-01-14T04:23:26+5:30
जिल्ह्यात यंदा ९५ हजार हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी झाली. रबी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू व हरभऱ्याचे पीक घेतले जाते. ...

ढगाळ वातावरणामुळे तुरीचे उत्पादन घटणार
जिल्ह्यात यंदा ९५ हजार हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी झाली. रबी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू व हरभऱ्याचे पीक घेतले जाते. रबी हंगामात जादा उत्पन्न मिळेल असे वाटत होते. मात्र, गेल्या काही दिवसापासून जिल्हाभरच ढगाळ वातावरण आहे. अशा वातावरणामुळे थंडी कमी होऊन रबी पिकांवर अनिष्ट परिणाम होतो. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात हरभरा व तूर लागवड करण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे हे दोन्ही पीक संकटात सापडले आहेत.
बॉक्स
कपाशी वेचणीची घाई
गव्हाचे क्षेत्र २७ हजार ८२६ हेक्टर आहे. ज्वारीचे क्षेत्र सहा हजार ५७३ हेक्टर इतके आहे. नोव्हेंबर महिन्यात पेरणीची टक्केवारी कमी होती. धान कापणी पूर्ण झाली. कापसाची वेचणी सुरूच आहे. मात्र बदललेल्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.