प्लास्टिक मुक्त पर्यावरणासाठी स्वाब नेचरकडून पेरजागड डोंगराची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST2021-08-19T04:32:07+5:302021-08-19T04:32:07+5:30
तळोधी बाः वनपरिक्षेत्र तळोधी(बा.) व स्वाब नेचर केयर संस्था यांच्या संयुक्त ...

प्लास्टिक मुक्त पर्यावरणासाठी स्वाब नेचरकडून पेरजागड डोंगराची स्वच्छता
तळोधी बाः वनपरिक्षेत्र तळोधी(बा.) व स्वाब नेचर केयर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सारंगड सातबहिणी पहाडी येथे प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान संकल्पनेतून डोंगराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी पी.आर.टी. टीमची कार्यशाळाही पार पडली.
दरम्यान, स्वाब नेचर केअर संस्थांच्यावतीने प्लास्टिकमुक्त पर्यावरण अंतर्गत पेरजाग़ड ( सातबहिणी) डोंगरपायथा ते शिखरापर्यंत संपूर्ण परिसरातील प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, दारू बाटल्या, गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र अंतर्गत पीआरटी सदस्यांना मानव व वन्यजीव संघर्ष या विषयावर स्वाब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष व मार्गदर्शक यशवंत कायरकर यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर सातबहिणी डोंगर शिखर ते डोंगर पायथा 'पर्यावरण प्लास्टिक मुक्त अभियानांतर्गत साफसफाई करण्यात आली. गोविंदपूरचे क्षेत्र सहाय्यक आर. एस. गायकवाड यांच्यासह गौरकर, पेंदाम, चहांदे, एस. एम. जुमनाके या वनरक्षकांसह स्वच्छता अभियानात कोजबी, वैजापूर, सारंगड, सोनापूर, कच्चेपार, गोविंदपूर, गिरगाव, सावरगाव येथील पी.आर.टी. टिमने सहभाग घेतला होता. स्वाब नेचर केअर संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्निल बोधनकर, सहसचिव हितेश मुंगमोडे, कोषाध्यक्ष गोपाल कुंभले, सदस्य जिवेश सयाम, विकास बोरकर, महेश बोरकर, प्रतिकार बोरकर, सचिन निकुरे, वेदप्रकाश मेश्राम उपस्थित होते.