स्वाब नेचर केअर संस्थेतर्फे डोंगर परिसराची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST2021-01-18T04:26:25+5:302021-01-18T04:26:25+5:30
तळोधी (बा.) : स्वाब नेचर केअर संस्थेतर्फे पेरजागड (सात बहिणी) डोंगर आणि डोंगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ...

स्वाब नेचर केअर संस्थेतर्फे डोंगर परिसराची स्वच्छता
तळोधी (बा.) : स्वाब नेचर केअर संस्थेतर्फे पेरजागड (सात बहिणी) डोंगर आणि डोंगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, पत्रावळी संकलित करून त्याची विल्हेवाट करण्यात आली. स्वाब नेचर केअर संस्थेतर्फे परिसरातील डोंगर व परिसरात स्वच्छता अभियान राबवून डोंगर प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार परिसरातील तलाव, पर्यटनस्थळ, निसर्गरम्य स्थळ साप्ताहिक पाळीने स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार पेरजागड परिसर प्लास्टिक कचरामुक्त करण्यात आला. या अभियानात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कायरकर, सदस्य सचिन निकुरे, विकास बोरकर, हितेश मुंगमोडे, वेदप्रकाश मेश्राम, महेश बोरकर, प्रतिकार बोरकर, प्रशांत सहारे, श्रेयस कायरकर, वन विभागाचे एस. एस. गौरकर, वनरक्षक येनुली (माल), वनरक्षक एस. जुमनाके आदी उपस्थित होते.