स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत अभियान
By Admin | Updated: September 27, 2016 00:53 IST2016-09-27T00:53:10+5:302016-09-27T00:53:10+5:30
संत निरंकारी मंडळाच्या चंद्रपूर शाखेच्या वतीने स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन बाबुपेठ येथे राबविण्यात आले.

स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत अभियान
चंद्रपूर : संत निरंकारी मंडळाच्या चंद्रपूर शाखेच्या वतीने स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन बाबुपेठ येथे राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला रेल्वेचे वरिष्ठ मंडळ अभियंता पी.व्ही.व्ही. सत्यनारायणा व एल. यू. करमनकर तसेच संत निरंकारी मंडळाचे मुखी शाम जेठवाणी, अशोक मते, शेरसिंग थापा, प्रकाश सूरजागडे, सेवादल संचालक राजेश तडसे, शिक्षक गणेश बजाईत, संचालिका सुलोचना जेठवाणी , मीना मत्ते, रंजना सूरजागडे, रोमा कुकरेजा, मंगला कांबळे, सोनी जवाहरमलानील मालेकर, नंदा काटोले, नम्रता मोरे, सोहन सुपारे व इतर सर्वांनी या स्वच्छता अभियानामध्ये मोलाचे सहकार्य केले. ९१ ट्रेनची चौकशी केली असता २१०० प्रवाशांना विचारणा केली. त्यात ४१ तक्रारी दुरुस्त करण्यात आल्या. यात ४४१ केसेस दाखल करण्यात आले. त्यातून ६५ हजार ६१ रुपये वसूल करण्यात आले, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या अभियानामध्ये स्वच्छतेकरिता ३२ डस्टबिन दान करण्यात आले, असे प्रकाश सुरजागडे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)