स्वच्छ भारत मिशनला चलनबंदीमुळे ‘ब्रेक’
By Admin | Updated: December 22, 2016 01:42 IST2016-12-22T01:42:15+5:302016-12-22T01:42:15+5:30
देश स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून पंतप्रधानांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.

स्वच्छ भारत मिशनला चलनबंदीमुळे ‘ब्रेक’
बँकाकडून धनादेशाची रक्कम देण्यास नकार
सिंदेवाही : देश स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून पंतप्रधानांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. इतकेच नव्हे तर नवीन नोटा छापताना त्यावर ‘स्वच्छ भारत’ असा संदेश लिहिला आहे. मात्र शासनाच्या चलनबंदीच्या आदेशाने स्वच्छता मिशनला ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
स्वच्छतेची मोहिम हाती घेताना शौचालय निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. जे गाव गोदरीमुक्त आहे, अशाच गावाना या अभियानात भाग घेता येतो. यामुळे पहिली पात्रता पूर्ण करण्याकरिता प्रत्येक गाव आणि ग्राम पंचायत त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना बँकेच्या नियमाने मोठा अडसर निर्माण केला आहे. कामाची गती मंदावल्याने स्वच्छता मिशनमध्ये प्रथम असणारे तालुके मागे पडत असल्याने दिसत आहे.
घरी शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत आणि एमआरईजीएसमधून १२ ते १७ हजार रुपये दिले जातात. मात्र याकरिता एक अट आहे. पहिल्यांदा शौचालयाचे काम टप्प्या-टप्प्याने पूर्ण करायचे. त्यानुसार निधी वितरीत करण्यात येतो. शौचालय बांधण्याचे काम हाती घेणारे कुटुंबिय आर्थिक दृष्ट्या कुमकुवत आहे. यामुळे आजपर्यंत त्यांना शौचालय उभारता आले नाही. अशा स्थितीत योजनेत सहभाग घेतला गेला. इकडून- तिकडून काही पैसे गोळा झाले. मात्र बँकेचा धनादेश वढतच नाही. यामुळे नविन काम थांबले आहे.
अनेक मजूर कामावर येण्यास तयार नाही. धनादेश मंजूर झाला असला तरी बँकेतून दोन हजारांवर लाभार्थ्यांचे पैसे निघत नाही. यातील बहुतांश लाभार्थी जिल्हा बँकेचे खातेदार आहे. यामुळे लाभार्थ्यांना दररोज तासन्तास बँकेत थांबावे लागत आहे. यानंतरही पैसे मिळण्याची शक्यता नाही, यामुळे कामे थांबली आहेत. (शहर प्रतिनिधी)