शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

३७१ एकर वनभूमीवर वनहक्काचा दावा

By admin | Updated: June 4, 2014 23:37 IST

भद्रावती तालुक्यातील कोंढेगाव (माल) येथील ग्रामस्थांनी ३७१.६७ एकर वनजमिनीवर सामूहिक वनहक्क दावा केला आहे. सदर दावा मान्य करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली आहे. ग्रामसभेचे सचिव प्रशांत ताटेवार

वडाळा (तु.) : भद्रावती तालुक्यातील कोंढेगाव (माल) येथील ग्रामस्थांनी ३७१.६७ एकर वनजमिनीवर सामूहिक वनहक्क दावा केला आहे. सदर दावा मान्य करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली आहे. ग्रामसभेचे सचिव प्रशांत ताटेवार यांनी एका शिष्टमंडळाच्या उपस्थितीत हा दावा पुढील कारवाईसाठी उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा यांच्या कार्यालयात नुकताच सादर केला आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्क मान्य करणे अधिनियम २00६ व नियम २00८ आणि सुधारणा नियम २0१२ नुसार एकूण २९0 ग्रामस्थांनी निस्तार पत्रकातील नोंदीप्रमाणे ३७१.६७ एकर वनजमिनीवर सामूहिक वनहक्क दाव्याची मागणी केली होती. सदर दावा गावसमुहाने वनहक्क समितीकडे सादर केल्यानंतर ७ मे २0१३ रोजी सदर दाव्याच्या पडताळणी करण्याकरिता सभा बोलाविण्यात आली. त्या सभेच्या नोटीस तहसीलदार भद्रावती,  वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मोहर्ली, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) मोहर्ली, संवर्गविकास अधिकारी, तालुका निरीक्षक भुमिअभिलेख भद्रावती, ग्रा.पं. कोंढेगाव यांना पाठविण्यात आल्या होत्या. दाव्याच्या पडताळणीच्या वेळी दाव्यामध्ये मागणी केलेल्या सर्व मुद्यावर कोणाचाही आक्षेप आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी केलेला दावा योग्य आहे. दिलेले पुरावे योग्य आहे. या कारणांमुळे सामूहिक वनहक्काचा दावा मान्य करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष वनहक्क समितीने नोंदवून ग्रामसभेत ठेवण्यासाठी ग्रामसभा सचिव यांच्याकडे पाठविण्यात आला.२१ मे २0१४ रोजी बोलाविण्यात आलेल्या ग्रासभेत संपूर्ण दाव्याचे व पडताळणी समितीच्या अहवालाचे वाचन करून मंजुरीसाठी ग्रामसभेत ठेवण्यात आला. त्याला ग्रामसभेत सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली. यावेळी २0५ ग्रामसभा सदस्य उपस्थित होते. ग्रामसभेने मंजूर केलेला सामूहिक वनहक्क दावा योग्य असल्याची खात्री करून वनहक्क मान्य करण्यासाठी शिफारस दाव्याच्या मूळ प्रतिसह व सर्व दस्ताऐवजासह उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती वरोरा यांचेकडे सादर केला. (वार्ताहर)