घुग्घुस नगर परिषदेसाठी नागरिक आंदोलनाच्या तयारीत
By Admin | Updated: February 12, 2015 00:58 IST2015-02-12T00:58:06+5:302015-02-12T00:58:06+5:30
नगर परिषद निर्मितीचा प्रश्न मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. शासन, जिल्हा प्रशासन, लोक प्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करुनसुद्धा याकडे दुर्लक्ष ...

घुग्घुस नगर परिषदेसाठी नागरिक आंदोलनाच्या तयारीत
घुग्घुस: नगर परिषद निर्मितीचा प्रश्न मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. शासन, जिल्हा प्रशासन, लोक प्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करुनसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. आता या मागणीसाठी नागरिकांनी आता रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.
औद्योगिक जिल्हा असल्याने शासनाला कोट्यवधीचा महसूल प्राप्त होतो. विशेष म्हणजे, घुग्घूसची लोकसंख्या २००१ च्या जणगनेनुसार २९ हजार ९५४, आहे. तर २०११ नुसार ३२ हजार ७३२ आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. नगर परिषदेची उद्घोषणा १९९९ मध्ये झाली आहे. वेळोवेळी या क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींकडून आश्वासने देण्यात आली आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षापासून केवळ कागदीघोडे शासन प्रशासनाकडून चालविले जात आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्धीकी तथा घुग्घुस नगर परिषद संघर्ष समितीने माहितीच्या अधिकारात वेळावेळी नगर व ग्राममंत्रालयाकडून माहिती मिळविले आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेकडून पाठवलेली माहिती ही अपुरी आहे. अशीच उत्तर मिळत आहे. त्या कामचुकार अधिकाऱ्यांवर आता कारवाई करण्याची मागणी होत आहे. नगर परिषदेसाठी मंत्रालयाकडून कारवाई होत नाही सोबतच स्थानिक लोक प्रतिनिधी मात्र गप्प असल्याचे चित्र सध्या येथे बघायला मिळत आहे. घुग्घुस नगर परिषदेच्या निर्मितीकरिता घुग्घुस नगर परिषद निर्मितीबाबत रस्ता रोको, घुग्घस बंद, आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाची कुठेही दखल घेतली नसल्याने आता पुन्हा नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहे.(वार्ताहर)