महागाई वाढल्याने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST2021-04-17T04:28:10+5:302021-04-17T04:28:10+5:30
बाबूपेठ परिसरात घाणीचे साम्राज्य चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा ...

महागाई वाढल्याने नागरिक त्रस्त
बाबूपेठ परिसरात घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: बाबूपेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
पेन्शनमध्ये वाढ करावी
चंद्रपूर : खासगी कंपन्या, महामंडळे, सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून पेन्शन मिळत आहे. मात्र ते अत्यल्प आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या कामगारांच्या पेेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे.
सराई मार्केट परिसरात अस्वच्छता
चंद्रपूर : शहरातील सराई इमारत परिसरामध्ये कचरा टाकल्या जात असल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
बचतगटही आले अडचणीत
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बचत गटही अडचणीत आले आहेत. काही बचत गटातील सदस्यांना उचललेले कर्जच भरता आले नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे.
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
चंदपूर : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रेडियम लावण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, अशी मागणी सहयोगी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील काही वार्डामध्ये मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता आहे. या जनावरांचा बंदोबस्त करून अपघाताला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
वीज ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये नियमित वीज खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: बंगाली कॅम्प, बाबूपेठ परिसरामध्ये ही समस्या आहे. याकडे महावितरणने लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.