राइस मिलमधील धानाच्या भुशामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:25+5:302021-01-17T04:24:25+5:30
याबाबत वारंवार सूचना व तक्रार करूनही राइस मिल मालकाने कुठलीही दखल न घेतल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे. ...

राइस मिलमधील धानाच्या भुशामुळे नागरिक त्रस्त
याबाबत वारंवार सूचना व तक्रार करूनही राइस मिल मालकाने कुठलीही दखल न घेतल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे.
येथील बस थांब्यालगत स्वस्तिक राइस मिल आहे. यामध्ये धानाची पिसाई केल्या जाते. राइस मिल परिसरात बऱ्याच नागरिकांची घरे आहेत. मिलमध्ये धान्य पिसाई करताना पाइपमधून उडणारा भुसा नागरिकांच्या घरात, अंगणात, कपड्यांवर, जेवणाच्या पदार्थांवर, पिण्याच्या पाण्यात उडत जात असल्यामुळे नागरिकांना या भुशाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत मिल मालकांना सूचना दिली व बंदोबस्त करण्याची मागणी केली असता, त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. दरम्यान, या समस्येबाबत ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे आणि राइस मिलपासून होणाऱ्या प्रदूषणाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बंदोबस्त न करण्यात आल्यास येथील महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.