अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:07+5:302020-12-31T04:28:07+5:30
चिमूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्याची दुरवस्था चिमूर: तालुक्यातील अनेक गावातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहन धारकांना तारेवरची कसरत ...

अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त
चिमूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्याची दुरवस्था
चिमूर: तालुक्यातील अनेक गावातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोरपना क्रीडा संकुलाची दुरवस्था
कोरपना : येथील तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तरुणांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सद्य स्थितीत क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहे. इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. विज व पाण्याच्या व्यवस्थेचा अभाव आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
इमारतीची पुनर्बांधणी करावी
नागभीड : शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करणे गरजेची आहे. सदर कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे.परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे.