रस्त्याच्या दैनेमुळे नागरिक त्रस्त

By Admin | Updated: August 29, 2015 01:18 IST2015-08-29T01:18:31+5:302015-08-29T01:18:31+5:30

राजुरा तालुक्यातील लक्कडकोट महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत लक्कडकोट ते गोयेगाव या राष्ट्रीय महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे.

Citizen's stricken by road day | रस्त्याच्या दैनेमुळे नागरिक त्रस्त

रस्त्याच्या दैनेमुळे नागरिक त्रस्त

देवाडा : राजुरा तालुक्यातील लक्कडकोट महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत लक्कडकोट ते गोयेगाव या राष्ट्रीय महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे. बरेच अपघात घडत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करुनही दुर्लक्ष होत असल्याने जनतेत तीव्र संपात व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा चंद्रपूर-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग राजुरा लक्कडकोट मार्गे जातो. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनाची या मार्गावर जास्त प्रमाणात वर्दळ असते. परंतु मागील काही महिन्यापासून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे वाहन घाटावरुन चालवणे म्हणजे मृत्यूशी झुंज दिल्यासारखे आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सीमेपर्यंत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे आहे. त्यानंतरच्या तेलंगाना सीमेपासून त्यांच्या शासनाने उच्च प्रतिचे डांबरीकरण केलेले आहे. त्यामुळे जनतेचा रोष महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. लक्कडकोट ते गोयेगाव या चार किमी अंतरास पाहाडी घाटाचा रस्ता जात असून याच ठिकाणी रस्त्याची पूर्णत: दुर्दशा झालेली आहे. वाहन चालकाना मोठ्या कसरती करत वाहन चालवावे लागत आहे. या खड्ड्यामुळे आतापर्यंत बरेच अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. १५ दिवसाच्या आत या मार्गाची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला.

Web Title: Citizen's stricken by road day