कबड्डीसाठी नागरिकांनी योगदान द्यावे

By Admin | Updated: December 20, 2015 00:52 IST2015-12-20T00:52:54+5:302015-12-20T00:52:54+5:30

कबड्डी लाल मातीचा खेळ आहे. कबड्डी खेळताना संघ भावना, जिद्द, चिकाटी, एकाग्रता खेळाडूंना लागते.

Citizens should contribute for the kabaddi | कबड्डीसाठी नागरिकांनी योगदान द्यावे

कबड्डीसाठी नागरिकांनी योगदान द्यावे

एकनाथ शिंदे : वरोरा येथे विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा
वरोरा : कबड्डी लाल मातीचा खेळ आहे. कबड्डी खेळताना संघ भावना, जिद्द, चिकाटी, एकाग्रता खेळाडूंना लागते. त्याकरिता खेळाडू सर्वस्व पणाला लावते. कबड्डी खेळाडूंना चांगले दिवस आले पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी कबड्डी खेळाकरिता योगदान दिले पाहिजे. वरोऱ्यासारख्या ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धेचे नियोजन करुन आयोजन केले आहे. ही बाब गौरवास्पद आहे, असे उद्गार सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ते वरोरा येथे आयोजित तीन दिवसीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
शिवसेना सुवर्ण महोत्सव, जयहिंद क्रीडा मंडळ, मराठा चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा शहरात तीन दिवसीय राज्यस्तरीय पुरुष व महिलांचे आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहनिर्माण व उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर होते. यावेळी आमदार बाळू धानोरकर, आमदार मंगेश कुडायकर, आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. राहुल पाटील, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, महिला संघटक भारती दुधाने, पोलीस अधीक्षक संदीप दिवान, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयस्वाल, तहसीलदार प्रमोद कदम, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरोरा शहरातील विविध क्षेत्रात कामगिरी बजाविणारे ना.गो.थुटे, बळवंत दारापुरकर, अ‍ॅड. जयवंत काकडे, प्रल्हाद ढक, गजानन जीवतोडे, प्रविण खिरटकर, पुरुषोत्तम आगलावे यांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Citizens should contribute for the kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.