औद्याेगिक परिसरात रोजच्या मृत्यूने नागरिक दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST2021-05-06T04:30:08+5:302021-05-06T04:30:08+5:30
आवाळपूर : आवाळपूरला औद्योगिक परिसर म्हणून ओळखले जाते. या परिसरात कोरोनाने थैमान घातले असूूून सद्य:स्थितीत अंदाजे सहाशेच्या वर नागरिकांना ...

औद्याेगिक परिसरात रोजच्या मृत्यूने नागरिक दहशतीत
आवाळपूर : आवाळपूरला औद्योगिक परिसर म्हणून ओळखले जाते. या परिसरात कोरोनाने थैमान घातले असूूून सद्य:स्थितीत अंदाजे सहाशेच्या वर नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ३५ व्यक्ती दगावले आहेत.
रोज कोरोनानेे व्यक्ती दगावत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात रोजच २० ते २५ नागरिकांची चाचणी पॉझिटिव्ह येत असल्याने याला जबाबदार तरी कोण, असा प्रश्न येथील नागरिकांना पडू लागला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील असून त्यावर कुणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवैध धंदे फोफावले दिसून येत असून परिसरात रेलचेलसुद्धा दिसून येत आहे. रस्त्यावरील रहदारीमध्ये वाढ झालेली दिसून येत असून दळणवळण व रिकामे फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
बॉक्स
पोलिसांची बघ्याची भूमिका
लॉकडाऊन म्हटले की तगडा बंदोबस्त असलेला दिसायचा. मात्र, यावर्षी फक्त नाममात्र दिसत असून कुठल्याही प्रकारची नागरिकांना विचारणा अथवा टोकले जात नाही. परिसरात दुकान बंद असले तरी लॉकडाऊनसारखे दिसत नसल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. त्यातल्या त्यात मात्र पोलीस प्रशासनाने ढील दिली असून बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
बॉक्स
लग्नसोहळे व कार्यक्रम सुरूच
कोरोनाने परिसरात थैमान घातले असले तरी गावातील लग्नसोहळे व कार्यक्रम सुरूच असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील एका गावात लग्न व मटणाच्या मेजवान्या होत आहे. त्यामुळे कोरोनाबधिताची संख्या वाढली असावी, अशीही शक्यता आहे. यावर प्रशासनाने लक्ष देऊन कार्यक्रमांवर अंकुश लावण्याची गरज आहे.
परिसरातील तापसदृश साथ असून येथील डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दी पाहायला मिळेत आहे. आरोग्य विभागाने दखल घेऊन ताप येत असलेल्या घरी भेट देऊन त्याची तपासणी करावी. जेणेकरून गावागावांत संसर्ग वाढणार नाही.
गावागावांत गृहविलगीकरण घातक ठरत असून संसर्ग वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे.