प्रवासी निवाऱ्याला नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:33 IST2018-09-11T22:33:01+5:302018-09-11T22:33:51+5:30

शहरातील नझूलच्या जागेवर प्रवासी निवारा बांधण्यात येत आहे. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार प्रवृतीचे लोक राहत असल्यामुळे बसस्थानक झाल्यास गुन्हेगारी प्रवृतीमुळे अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे सिव्हील लाईन परिसरात बांधण्यात येणाºया प्रवासी निवाºयाला पटेल नगरी परिसरातील नागरिकांनी विरोध केला असून याबाबतचे निवेदन वनमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

Citizens' opposition to the passenger's resident | प्रवासी निवाऱ्याला नागरिकांचा विरोध

प्रवासी निवाऱ्याला नागरिकांचा विरोध

ठळक मुद्देपटेलनगरी परिसरातील नागरिकांची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील नझूलच्या जागेवर प्रवासी निवारा बांधण्यात येत आहे. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार प्रवृतीचे लोक राहत असल्यामुळे बसस्थानक झाल्यास गुन्हेगारी प्रवृतीमुळे अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे सिव्हील लाईन परिसरात बांधण्यात येणाºया प्रवासी निवाºयाला पटेल नगरी परिसरातील नागरिकांनी विरोध केला असून याबाबतचे निवेदन वनमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
चंद्रपुरातील सिव्हील लाईन, शिट क्रमांक ६ ब्लॉक ११ प्लॉट नं. १० या महानगरपालिकेच्या नावाने दिलेली नझुलच्या जागेवर प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम सुरु आहे. मात्र या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांचे वास्तव्य आहे. तसेच या ठिकाणहून रेल्वे स्टेशन व बसस्थानक जवळ असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अवैध दारु, गांजा अफीम, आदी व्यसन या परिसरात मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्यामुळे या परिसरात प्रवासी निवारा बांधल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचे अधिराज्य निर्माण होईल. त्यामुळे याठिकाणी प्रवासी निवाºयांचे बांधकाम करु नये, अशा मागणीचे निवदेन पटेल नगरी परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ. रितेश दिक्षीत, डॉ. मंगेश टीपणीस, राजेश आनंद आदींनी केली आहे.
धोका होण्याची शक्यता
प्रवासी निवाऱ्यामध्ये रात्री बेरात्री महिला व मुली प्रवास करण्यासाठी येत असतात. मात्र या परिसरात गुन्हेगारी प्रवृतींचे लोकांचे वास्तव्य असल्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासी निवाºयांचे स्थालांतर करण्यात यावे, अशी मागणी पटेल परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Citizens' opposition to the passenger's resident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.