शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

परराज्यातील नागरिकांनाही मिळणार रेशन दुकानातून धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने रेशन पोर्टबिलीटी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परराज्यातील नागरिकांनाही अडकलेल्या ठिकाण पसिरातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. या सुविधेमुळे काही प्रमाणात का होईना या अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देपोर्टबिलिटी। एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जागोजागी नागरिक अडकले आहे. या नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने रेशन पोर्टबिलीटी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परराज्यातील नागरिकांनाही अडकलेल्या ठिकाण पसिरातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. या सुविधेमुळे काही प्रमाणात का होईना या अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.केंद्र शासनाने ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ या योजनेंतर्गत काही राज्यांसोबत आंतरराज्य पोर्टबिलीटीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, राज्यस्थान, उत्तरप्रदेश व बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश आहे. यामुळे या नागरिकांनाही चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलता येणार आहे. यासाठी त्यांच्याजवळ त्या राज्यातील रेशनकाडवर नाव असने गरजेचे आहे.असे होणार अन्नधान्य वितरणजिल्ह्यामध्ये मे २०२० मध्ये योजना निहाय अन्नधान्य वाटप परिमाण ठरलेले आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे. अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रति कार्ड २ रुपये प्रती किलो दराने गहू १५ किलो, ३ रुपये प्रति किलो दराने तांदूळ २० किलो तर २० रुपये प्रति किलो दराने एक किलो साखर मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ रुपये प्रति किलो दराने गहू ३ किलो, २ रुपये प्रति किलो दराने २ किलो तांदूळ मिळणार आहे.कार्ड नसलेल्यांना रहावे लागणार वचिंतकार्डधारकांनी दुकानात धान्य घेताना सामाजिक अंतर तसेच मास्क घालणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा व्यक्तींनी चौकशी करण्याकरिता रास्तभाव दुकानात जाऊन त्रास देवून नये, त्यांना काही चौकशी करायची असल्यास संबंधित तहसिल कार्यालयाकडे किंवा प्रसिध्द केलेल्या हेल्पलाईन क्रमाकांवर सपंर्क साधावा. रेशनकार्ड नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने दुकानदारांना धान्याची मागणी करु नये किंवा त्यांच्यावर दबाव आणू नये.- राजेंद्र मिस्किन,जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूरआधार लिंकिंग आवश्यकजिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजेच, सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेतच दुकाने उघडे ठेवावे लागणार आहे. केंद्र शासनाचे सुचनेनुसार मे-२०२० महिन्यात धान्य वाटप करताना ईपॉस मशिनवर प्रत्यक्ष कार्डधारक लाभार्थ्याचा अंगठा लावायचा आहे. त्यानुसार ज्यांचे नाव रेशनकार्डवर आहे व आधार क्रमांक नोंदवलेला आहे अशाच व्यक्तींना धान्य मिळणार आहे. दुकानदारांनी धान्य घेण्यास येणाºया प्रत्येक लाभार्थ्यांकरिता हात धुण्याकरिता साबण व पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.प्राधान्य कुटुंबांनाही धान्यअंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही योजनेच्या रेशन कार्ड धारकांना प्रति माणसी ५ किलो तांदूळ मोफत म्हणजेच, एका कार्डवर ४ व्यक्ती असतील तर त्यांना २० किलो तांदुळ मोफत मिळणार आहे. मे -२०२० महिन्यात या दोन्ही योजनेच्या प्रत्येक रेशनकार्डवर १ किलो डाळ (चणाडाळ/तुरडाळ) यापैकी जी उपलब्ध असेल ती मोफत मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कटुंब योजनेच्या प्रत्येक कार्डधारकास नियमित धान्य विकत घ्यावे लागणार आहे. धान्य घेतल्यानंतर त्यांना १ किलो डाळ व तांदुळ मानसी ५ किलो प्रमाणे मोफत मिळणार आहे. केशरी कार्ड धारकांना मे महिन्यात प्रति मानसी ३ किलो गहु ८ रुपये प्रति किलो व २ किलो तांदुळ १२ रुपये प्रमाणे त्यांचे कार्ड ज्या दुकानात नोंदविले आहे, त्याच दुकानातून मिळणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक