विद्युत वितरण अभियंत्यांना नागरिकांचा घेराव

By Admin | Updated: September 14, 2015 00:48 IST2015-09-14T00:48:25+5:302015-09-14T00:48:25+5:30

येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या .....

Citizen's encroachment for electrical distribution engineers | विद्युत वितरण अभियंत्यांना नागरिकांचा घेराव

विद्युत वितरण अभियंत्यांना नागरिकांचा घेराव

मेंडकी : येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या मेंडकी तसेच परिसरातील जनतेने विद्युत वितरण अभियंत्यांना घेराव घातल्याचा प्रकार मेंडकी येथे घडला आहे.
मेंडकी विद्युत वितरण कंपनी कार्यालयाअंतर्गत कळमगाव, जबराबोडी मेंढा, एकारा, रानबोथली अशा बऱ्याच गावखेड्यांचा परिसर येत येतो. मेंडकी तसेच परिसरातील वीज पुरवठा ७ आणि ८ सप्टेंबरला दोन दिवस खंडीत झाला होता. येथील विद्युत वितरण कार्यालयाचे अभियंता दिनेश झोडापे यांना मेंडकी तसेच परिसरातील काही नागरिकांनी येथील विद्युत पुरवठा खंडीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरी येथे वास्तव्याने राहत असल्याने ‘होय आपण मेंडकीला येऊनच राहिलो आहे, काही वेळातच विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे मोबाईलवरुन काही नागरिकांना सांगितले. दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबरला विद्युत पुरवठा सुरू न झाल्याने कळमगाव, जवराबोडी मेंडा, मेंडकी येथील जवळपास १०० ते २०० लोकांनी रात्री ८ वाजता मेंडकी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एकत्र येऊन अभियंता दिनेश झोडापे यांना विद्युत पुरवठा सुरू का झाला नाही, याबाबत मोबाईलवर विचारणा केली असता अभियंता दिनेश झोडापे यांनी उडवा-उडवीचे उत्तरे देवून टाळाटाळ करून फोन ठेवून दिला.
त्यानंतर परत पुन्हा अभियंता दिनेश झोडापेंना फोन केला असता विद्युत पुरवठा आता सुरू होऊ शकत नाही, असे सांगितले. त्रस्त झालेल्या लोकांनी अभियंता दिनेश झोडापे यांना तुम्हाला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करायचा आहे की नाही, नसेल करायचे तस सांगा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील, असे ठणकावून सांगितले. अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरीवरुन आपल्या कर्मचाऱ्यासोबत रात्री ११ वाजता कार्यालयाजवळ येताच त्रस्त झालेल्या १०० ते २०० लोकांनी अभियंत्यांना घेराव घालून प्रश्नाची सरबत्ती केली. हे प्रकरण अधिक तापले असतानाच मेंडकी येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले.
त्यानंतर सदर प्रकरण शांत झाले. त्यानंतर मेंडकी येथील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खैरकर आणि त्यांचे कर्मचारी तसेच मेंडकीचे उपसरपंच यशवंत आबोरकर व जवराबोडी मेंडा, कळमगाव मेंडकी येथील उपस्थित लोकांनी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी पहाटेच्या ४ वाजतापर्यंत विद्युत कर्मचाऱ्यांना सहकार्य करून वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)

Web Title: Citizen's encroachment for electrical distribution engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.