वेकोलिच्या दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:53+5:30

वायू प्रदूषणमुळे माजरी परिसरात नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांचे विकार, कर्करोग, दमा, चर्मरोग, पोटाचे विकार व अन्य विकाराने ग्रस्त झाल्याचा आरोप केला जात आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात राज्य शासन, वेकोलिचे संचालक, वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधक व संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन दिले. मात्र वेकोलि प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे.

Citizens are shocked by the contaminated water of Wacoli | वेकोलिच्या दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण

वेकोलिच्या दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप : श्वसनाचे आजार वाढल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वेकोलिने कोळसा उत्पादन करताना वायु व जल प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपायोजना न केल्याने शहरातील नैसर्गिक जलस्त्रोत दूषित झाले. श्वसनाशी निगडीत विविध आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.
वायू प्रदूषणमुळे माजरी परिसरात नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांचे विकार, कर्करोग, दमा, चर्मरोग, पोटाचे विकार व अन्य विकाराने ग्रस्त झाल्याचा आरोप केला जात आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात राज्य शासन, वेकोलिचे संचालक, वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधक व संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन दिले. मात्र वेकोलि प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. १२ डिसेंबर २०१९ रोजी नागलोन यूजी टू ओसी खुल्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणासाठी कुचना येथे जनसुनावनी झाली होती. नागरिकांनी माजरी शहरातील पाणी व वायु प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित केला होता. विविध कोळसा खाणींमुळे पाणी कसे खराब होत आहे, याकडे या सुनावणीत लक्ष वेधले.
माजरी शहराची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या वर्धा नदीत दूषित सोडणे बंद करा, अशी मागणी केली होती. जनसुनावणीदरम्यान प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मधुकर लाड उपस्थित होते. वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, त्यानंतर कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानत आहेत.

कामगार वसाहतीत दुर्गंधी
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस कामगार वसाहतीमध्ये नाल्यांची स्वच्छता केली जात नाही. वेकोलि व्यवस्थापणाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नाल्या घाणीने तुडूंब भरल्या आहेत. त्यामुळे कामगारा कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इंदिरा नगर, सुभाषनगर, शास्त्रीनगर, रामनगर, आंबेडकर नगर, राजीव रतन हॉस्पिटल कॉलनी, म्हातारदेवी कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून स्वच्छतेचे निर्देश देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


माजरी वेकोलि परिसरात सीएचपी व इतर विभागाकडून माहिती घेऊन प्रदूषणाला आळा घालण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. उपाययोजनेकडे वेकोलि विेशेष लक्ष देणार आहे.
- सुभोती अग्रवाल, पर्यावरण अधिकारी,
वेकोलि माजरी क्षेत्र.

Web Title: Citizens are shocked by the contaminated water of Wacoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.