रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:20+5:302021-03-09T04:31:20+5:30
जिवती : तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गम भागात असलेल्या गावातील ...

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक बेजार
जिवती : तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गम भागात असलेल्या गावातील रस्त्यावरून जाणे तर जिकिरीचे झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
हिमायतनगर ते बुद्धगुडा रस्त्याची मागणी
जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव विविध समस्यांनी ग्रस्त आहे. गावात योग्य रस्ते नाहीत. त्यामुळे लोकांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा हा रस्ता तयार करण्याची मागणी बुद्धगुडा गावातील नागरिकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
चिमूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड आणि मुख्य चौकांत मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला. त्यामुळे नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सुमठाणा-तेलवासा रस्त्याची दुरवस्था
भद्रावती : तालुक्यातील सुमठाणा ते तेलवासा हा रस्ता आयुध निर्माणी चांदा यांच्या अखत्यारीत येतो. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
बायपास मार्गाअभावी वाहतुकीची कोंडी
ब्रह्मपुरी : शहरातील वाहनांची वर्दळ वाढली. मात्र, ब्रह्मपुरी-वडसा मार्गावर बायपास नाही. त्यामुळे वाहनांची दररोज कोंडी होते. अपघाताचा धोका लक्षात घेऊन शहरवासीयांसाठी बायपास मार्ग तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात
गोंडपिपरी : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी अतिक्रमण केले. काहींना नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे स्वत:हून अतिक्रमण हटविले. मात्र, बरीच अतिक्रमणे अजूनही जैसे थे आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी प्रशासनाने मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
कोरपना-वणी बससेवेची मागणी
कोरपना : कोरपना व वणी येथून सायंकाळी बसफेरी नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वणी शहर या परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. परिणामी, शेकडो नागरिक ये-जा करतात. शिवाय या मार्गावरील लालगुडा, वाघदरा, मंदर, केसुर्ली, चारगाव चौकी, शिरपूर, कुरई, आबई, वेळाबाई, ढाकोरी बोरी, मूर्ती आदी गावांतील नागरिकांना बीच शेवटची बस आहे.
वनसडी मार्गावर जीवघेणे खड्डे
कोरपना : वनसडी-भोयगाव-चंद्रपूर मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे अपघातांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.