घुग्घुस येथे मुनगंटीवार, अहीर, श्यामकुळे व भोंगळे यांचा नागरी सत्कार

By Admin | Updated: May 1, 2017 00:39 IST2017-05-01T00:39:03+5:302017-05-01T00:39:03+5:30

येथील प्रमोद महाजन रंग मंचावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ...

Citizen felicitations of Mungantiwar, Ahir, Shyamkule and Bhongale at Ghughus | घुग्घुस येथे मुनगंटीवार, अहीर, श्यामकुळे व भोंगळे यांचा नागरी सत्कार

घुग्घुस येथे मुनगंटीवार, अहीर, श्यामकुळे व भोंगळे यांचा नागरी सत्कार

घुग्घुस : येथील प्रमोद महाजन रंग मंचावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे आणि नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा घुग्घुस नागरी सत्कार समितीकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच पुष्पा मेश्राम नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य नितू चौधरी, पं.स. सदस्य निरिक्षण तांड्रा यांची मंचावर उपस्थिती होती.
गावाच्या विकासासाठी विविध कामे आपल्या आशिर्वादाने आपल्या सहकार्याच्या माध्यमातून झाले. गावाच्या विकासासाठी पक्षभेद, हेवेदावे विसरून एकत्र येण्याची परंपरा आजही कायम असल्याचे मत सत्कारमूर्तींनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी गावातील विविध क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्था, विविध समाज व नागरिक अशा ८७ पेक्षाअधिक लोकांनी सत्कारमूर्तींचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन माहुरे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Citizen felicitations of Mungantiwar, Ahir, Shyamkule and Bhongale at Ghughus