सीआयएसएफ जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 00:44 IST2016-10-28T00:44:02+5:302016-10-28T00:44:02+5:30

झारखंड राज्यातील रांची येथे सीआयएसएफ मध्ये कार्यरत जवान अंगद भानुदास घुले रा. शेणगाव यांचे ...

CISF virus causes cardiovascular death | सीआयएसएफ जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

सीआयएसएफ जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

टेकामांडवा : झारखंड राज्यातील रांची येथे सीआयएसएफ मध्ये कार्यरत जवान अंगद भानुदास घुले रा. शेणगाव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी रात्री निधन झाले.
अंगद घुले हे जिवती तालुक्यातील शेणगाव येथील रहिवासी असून काही दिवसांपूर्वी मोटार सायकल अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला होता. त्यांच्या पायाचा हाड तुटल्यामुळे रांची येथील सरकारी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता. परंतु उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी व एक वर्षाची मुलगी आहे. तसेच वृद्ध आई आणि वडील व वडील बंधू असा आप्त परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवार २८ आॅक्टोबरला शेणगाव येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: CISF virus causes cardiovascular death