राजुर्यात विद्युत अभियंत्यांना घेराव
By Admin | Updated: May 29, 2014 02:06 IST2014-05-29T02:06:16+5:302014-05-29T02:06:16+5:30
राजुरा: राजुरा तालुक्यातील रामपूर या एकाच गावात दररोज सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे.

राजुर्यात विद्युत अभियंत्यांना घेराव
राजुरा: राजुरा तालुक्यातील रामपूर या एकाच गावात दररोज सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पंचायत समितीे राजुरा येथे विद्युत विभागाचे अभियंता राहुल पाटील यांना दोन तास घेराव घातला. राजुरा तालुक्यात ४६ डिग्री तापमान असताना फक्त एकाच गावात त्या फिडरवरील वसुली कमी असल्याचे कारण दाखवून लोडशेडिंग करण्यात येत आहे. ज्या विद्युत ग्राहकांनी पैसे भरले नाही. त्याचे कनेक्शन कापण्याऐवजी सरसकट गावाचा विद्युत पुरवठाच बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. बहुतांश कर्मचारी रामपूरला राहतात. रात्रपाळीची कामे केल्यानंतर सकाळी जेव्हा येतात तेव्हा विद्युत बंद राहते. त्यामुळे ग्राहक या विद्युत विभागाच्या प्रणालीमुळे त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा निवेदन दिली. परंतु रामपूरची लोडशेडिंग सुरूच असून दोन दिवसात लोडशेडिंग बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. रामपूर येथील नागरिकांसोबत पंचायत समिती सभापती सिंधूताई बारसिंग यांच्या दालनात विद्युत विभागाचे अधिकार्यासोबत बैठक झाली. यावेळी विद्युत विभागाचे अभियंता राहुल पाटील, पंचायत समिती सदस्य नरेंद्र काकडे, निर्मला कुळमेथे, आबाजी ढवस, रामपूरचे सरपंच रमेश कुडे, गौरव चापले, गणेश पिंपळकर, रोशन ठावरी, कोमल फुसाटे, हरिश शिंदे, मारोती जानवे, मोहन शर्मा, महियर गुंडेवी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)