शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
2
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
3
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
4
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
5
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
6
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
7
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
8
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
9
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
10
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
11
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
12
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
13
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
14
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
15
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
16
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही आवडीने खाताय 'तो' च्यवनप्राश अस्सल की बनावट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:52 IST

Chandrapur : च्यवनप्राशमध्ये असावे ५२ औषधी वनस्पतींचे मिश्रण

परिमल डोहणे चंद्रपूर : रोगी राहण्यासाठी बरेचदा आयुर्वेदिक तरल च्यवनप्राश खाण्याचा सल्ला देतात. च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. आजारांशी दोन हात करायला ताकद मिळते. यासह दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. मात्र आजकाल अधिक नफा कमवण्याच्या नादात भेसळयुक्त च्यवनप्राश बाजारात विक्रीस आहेत. असे च्यवनप्राश खाल्ल्यास आरोग्याला कोणताच फायदा होत नाही. त्यामुळे अस्सल च्यवनप्राश सकाळी वा साध्यवेळेला खाण्यास पसंती द्यावी, असा सल्ला आयुर्वेदाचार्य डॉ. माधुरी धानोरकर यांनी दिला आहे.

असे ओळखा अस्सल च्यवनप्राशच्यवनप्राश अस्सल आहे की नकली हे ओळखण्यासाठी त्याची चव चाखा. जर च्यवनप्राश साखरेसारखा चवीला गोड लागत असेल, तर त्यात साखर मिसळली असावी. त्यामुळे च्यवनप्राश खरेदी करताना त्याची चव चाखूनच खरेदी करावी. च्यवनप्राश हा देशी तूप आणि गुळापासून बनवला जातो. देशी तूप आणि गुळ हे दुधात अथवा पाण्यात विरघळत नाही ते दुधावर तरंगतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरातील च्यवनप्राश पाण्यात किंवा दुधात विरघळला तर तो बनावट आहे.

फायबर, प्रोटीन अन् व्हिटॅमिनचा भरणाच्यवनप्राशमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बहुगुणी आवळा. आवळा व्हिटॅमिन सीचे भांडार आहे. तसेच अँटीऑक्सिडंट आहे. प्रोटीन, फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आदींनी परिपूर्ण असतो.

च्यवनप्राशमध्ये ५२ औषधी वनस्पतींचे मिश्रणअस्सल च्यवनप्राश ५२ हून अधिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केला जातो. ज्यामध्ये आवळा, अश्वगंधा, विदारीकंद, सफेद मुसळी, शतावरी, अर्जुन, मंगीळा, ब्राह्मी, बला, मुलेढी, वासा, पुनर्नवा, जिवंती, कष्टकारी, हिरडा, गुरूची, दशमूळ, गायीचे तूप, शहद, गूळ या सगळ्या गोष्टी ग्राऊंड करून वापरल्या जातात. त्यानंतर विलायची, पिंपळी वंशलोचन, तमालपत्र, सुंठ, केशर आदी द्रव्ये मिक्स केली जातात.

च्यवनप्राश म्हणजे काय?आयुर्वेद शास्त्रात चवनऋर्षीनी वार्धक्यावस्था दूर ठेवून तारुण्यावस्था प्राप्त करण्यासाठी एक रसायन औषधीचे सेवन केले व त्यांना तारुण्यावस्था प्राप्त झाली. तेव्हापासून 'त्या' रसायन औषधीचे नामकरण 'च्यवनप्राश' असे झाले, असे वर्णन आयुर्वेद शास्त्रात करण्यात आले आहे.

"च्यवनप्राशला रसायन औषधी म्हटले जाते. रसायन म्हणजेच जे शरीराला निरोगी, आरोग्यसंपन्न करते. तसेच वृद्धावस्था लवकर येऊ देत नाही. रोगप्रतिकारशक्ती शरीरबल, तेज, वाढवते. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशक्तपणा, जीर्ण, सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार, क्षयरोग आहे. त्यांनी इतर औषधांसह सकाळी एक ते दोन चमचे च्यवनप्राशचे सेवन करावे."- डॉ. माधुरी धानोरकर, आयुर्वेदाचार्य, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स