चुनाळा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:16+5:302021-04-24T04:28:16+5:30
सास्ती : राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरानाचा प्रादुर्भाव दिसून येत असून चुनाळा उपकेंद्रांतर्गत शंभराहून अधिक कोरोना बाधित रुग्ण असून ...

चुनाळा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट
सास्ती : राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरानाचा प्रादुर्भाव दिसून येत असून चुनाळा उपकेंद्रांतर्गत शंभराहून अधिक कोरोना बाधित रुग्ण असून पाच रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. चुनाळा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असताना आरोग्य विभागाने येथील सी.एच.ओला विसापूर येथील कोविड सेंटरला डेप्युटेशनवर पाठविण्यात आल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.
येथे त्वरित पूर्णवेळ सी.एच.ओ. देऊन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केली आहे.
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे आरोग्य विभागाचे वर्धिनी उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील लोकसंख्या जवळपास सहा हजार असून प्राथमिक आरोग्य केंद्र हे ३५ किमी अंतरावर चिंचोली (बु) येथे आहे. चुनाळा, बामनवाडा गावात सर्दी, खोकला, ताप या सारख्या आजाराचे मोठ्या प्रमाणात रूग्ण असून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. उपकेंद्रांतर्गत जवळपास १०० रूग्ण कोरोना बाधित आहेत. त्यापैकी ३५ रूग्ण कोविड सेंटरला असून इतर क्वारंटाईन आहेत तर पाच रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. असे असताना आरोग्य विभागाने येथे कार्यरत सी.एच.ओ. चे विसापूर येथील कोविड सेंटरला डेप्युटेशनवर पाठविण्यात आले आहे. ही बाब अंत्यत गंभीर असून गावातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांचे डेप्युटेशन त्वरित रद्द करून चुनाळा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर, सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी केली आहे.