चंद्रपुरातील आझाद बगिचा टाकणार कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 01:35 IST2016-02-12T01:35:44+5:302016-02-12T01:35:44+5:30
चंद्रपूरच्या ह्दयस्थळी असलेल्या आझाद बागेची मागील अनेक महिन्यांपासून दूरवस्था झाली आहे.

चंद्रपुरातील आझाद बगिचा टाकणार कात
सौंदर्यीकरण : देखभाल, दुरुस्तीचे देणार कंत्राट
चंद्रपूर : चंद्रपूरच्या ह्दयस्थळी असलेल्या आझाद बागेची मागील अनेक महिन्यांपासून दूरवस्था झाली आहे. मात्र आता या बागेचे सौंदर्यीकरण करून बालगोपालांसाठी खेळणेही लावण्यात येणार आहे. याविषयीच्या प्रस्तावाला मनपाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली असून तशा निविदाही काढल्याची माहिती आहे.
येथील महात्मा गांधी मार्गावर अगदी शहराच्या ह्दयस्थळी हा आझाद बगिचा आहे. या बगिचात दररोज हजारो नागरिक येतात. पहाटेपासूनच नागरिकांची या बागेत वर्दळ सुरू होते. सायंकाळीही नागरिक मोकळ्या हवेत फिरायला या बागेत येतात. विशेष म्हणजे, वयोवृध्द व बालगोपालही या बागेत येतात. त्यामुळे मुलांसाठी बागे काही वर्षांपूर्वी विविध खेळणे लावण्यात आले होते. आता हे खेळणे तुटले आहेत. काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने आझाद बागेच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट दिले होते. काही वर्षे कंत्राटदारांमार्फतच या बागेची देखभाल केली गेली. त्यावेळी या कंत्राटी कंपनीने विविध आधुनिक खेळणे बागेत लावले होते. मात्र पुढे हे कंत्राट रद्द झाले. तेव्हापासून मनपा प्रशासनच या बागेची देखभाल करीत आहे. शहराच्या ह्दयस्थानी ही बाग असल्यामुळे या बागेचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. आता महानगरपालिकेनेही या बागेचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)
आझाद बागेच्या देखभाल दुरुस्तीसाठी यापूर्वी निविदा मागविल्या होत्या. मात्र अद्याप एकही निविदा आलेली नाही. त्यामुळे पुन्हा निविदा मागविल्या आहेत. बागेचे सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे.
-संतोष लहामगे, सभापती, स्थायी समिती, मनपा चंद्रपूर.