शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जमिनीच्या पोतानुसार कापूस बियाणे निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:28 IST

जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सल्ला : जिल्ह्यात दरवर्षी वाढत आहे कापूस लागवड क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेच बियाण निवडावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्याचे त्यामध्ये नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कसे आहे. हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कापूस पिकाची जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड, मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी. जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्यांची निवड केली पाहिजे.लागवडीसाठी घ्यावयाची काळजीकापूस पिकाची लागवड ही प्रामुख्याने कोरडवाहु लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जिल्ह्यात काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पादन व पिकाची कमी वाढ या दोन समस्यांनी ग्रस्त असते. कोरडवाहु लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाण्यांचे नवीन जाती विकसित केल्या पाहिजे.कोरडवाहु कापसापासुन उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोरडवाहु भागासाठी कमी पाण्यात पीक येऊ शकेल, अशाच वाणांची लागवड करावी. वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसांचा असावा. जेणेकरून चांगला पाऊस राहील. त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्वता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.उगवणीपूर्वीचे तणनियंत्रणकोरडवाहु वाण लागवड करण्यापूर्वी शेतातील नेहमी उगविणाऱ्या तणांचे निरीक्षण करावे. रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरून सुरूवातीच्या काळातच तण नियंत्रण करावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी पूर्णत: पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असतात. एखाद्या वेळेला पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण करता येत नाही. कापूस पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपूर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.रासायनिक खतांचे प्रमाणकापूस पिकाला रासायनिक खते देताना स्फुरद व पालाश खताची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळेला द्यावी. रोप उगवणीनंतर पिकाला नत्र युक्त खतांची अर्धी मात्रा दिल्यास पीक चांगले वाढेल. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घ्यावी. लागवडीप्रसंगी नत्र युक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांत जमिनीत एकत्र करून टाकावी.वढा येथे जागृती शिबिरकृषी विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने कापूस लागवड तंत्रज्ञान व अनधिकृत कापूस बियाणे टाळण्यासाठी मार्गदर्शन शिबिर गुरूवारी वढा येथे शिबिर पार पडले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील व उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय काळे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकाचे महत्त्व पटवून दिले.पोलीस निरीक्षक आमले यांनी बोगस कापूस बियाणे विकत घेणे, शेतात लावणे व विक्री करण्यास मदत करणे हा गुन्हा आहे. अशा घटना घडल्यास आल्यास पोलीस विभागाला सूचना द्याव्यात, असे आवाहन केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूस