व्हॉटस्अ‍ॅपमुळे चिमुरडा आदित्य सुखरूप घरी परतला

By Admin | Updated: July 1, 2015 01:16 IST2015-07-01T01:16:26+5:302015-07-01T01:16:26+5:30

दुर्गापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून हरविला चिमुरडा आदित्य दुर्गापूर मेजरगेट परिसरात रडत इकडे तिकडे फिरत असताना रिक्षा चालकाने त्याला पोलिसांकडे नेले.

Chitra Aditya returned home safely due to the whitespace | व्हॉटस्अ‍ॅपमुळे चिमुरडा आदित्य सुखरूप घरी परतला

व्हॉटस्अ‍ॅपमुळे चिमुरडा आदित्य सुखरूप घरी परतला

चंद्रपूर: दुर्गापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून हरविला चिमुरडा आदित्य दुर्गापूर मेजरगेट परिसरात रडत इकडे तिकडे फिरत असताना रिक्षा चालकाने त्याला पोलिसांकडे नेले. हरविलेल्या आदित्यचे आई-वडील सापडावे म्हणून ठाणेदारांनी हा संदेश व्हाटस्अ‍ॅपर टाकला. प्रसिद्धी माध्यमांनीही यासाठी सहकार्य केले आणि दोन तासात चिमुरडा आदित्य आपल्या आई-वडिलांपर्यंत पोहचला.
त्याचे असे झाले, दुर्गापूर येथील समता वॉर्डातील अविनाश मुंडे यांचा पाच वर्षीय मुलगा मंगळवारी सकाळी शाळेतून हरविला. तो भटकत भटकत दुर्गापूर मेजरगेटजवळ पोहोचला. त्याला घर सापडेना. त्यामुळे तो गांगरून गेला. रडायला लागला. ही बाब आॅटोरिक्षा चालक कनिलाल ढोक यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला जवळ घेत विचारपूस केली. पण तो स्वत:चे नाव सांगण्यासही असमर्थ होता. त्यामुळे कनिलाल यांनी त्याला सोबत घेतले. त्याच्या घराचा शोध घेतला.
मात्र आदित्य बोलतच नसल्याने मोठा पेच निर्माण झाला. अखेर कनिलाल यांनी दुर्गापूर पोलीस ठाणे गाठून आदित्यबद्दल माहिती दिली.
ठाणेदार संपत चव्हाण यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच एक हरविलेला मुलगा सापडला असल्याचा संदेश व्हॉटस्अ‍ॅपच्या विविध गु्रपवर टाकला. एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्या वृत्तवाहिनीनेदेखील मुलगा सापडल्याचे माहिती प्रसारित केली. याचदरम्यान, आदित्यचे वडिल अविनाश मुंडेंना सोशल मिडीयाच्या माध्यमातून आदित्य सापडल्याची माहिती मिळाली ते लगेच ठाण्यात पोहचले. सर्वांचे मनापासून आभार मानत त्यांनी आदित्यला जवळ घेतले. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांच्या सहकार्यामुळेच आदित्य त्याच्या आई-वडिलांपर्यंत सुखरूप पोहचला, अशा प्रतिक्रिया ठाणेदार संपत चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.(प्रतिनिधी)

Web Title: Chitra Aditya returned home safely due to the whitespace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.