चिरोली, सुशी परिसरात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:17 IST2021-02-19T04:17:14+5:302021-02-19T04:17:14+5:30
मूल : राज्यात कोरोना संक्रमण वाढत असतानाही मागील काही वर्षांपासून चिरोली आणि सुशी परिसरात मोठ्या प्रमाणावर बोगस डाॅक्टर सक्रिय ...

चिरोली, सुशी परिसरात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट
मूल : राज्यात कोरोना संक्रमण वाढत असतानाही मागील काही वर्षांपासून चिरोली आणि सुशी परिसरात मोठ्या प्रमाणावर बोगस डाॅक्टर सक्रिय आहे. आरोग्य विभाग अशा बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्याचे सोडून अभय देत असल्याने त्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मूल तालुक्यातील चिरोली येथे कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला होता, चिरोली, सुशी परिसरातील नागरिक आजारी पडल्यास येथील बोगस डाॅक्टर घरी जाऊन रुग्णावर थातूरमातूर उपचार करीत आहे. यामुळे तपासणी टळून कोरोना रुग्णांमध्ये भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळी ६ वाजतापासून बोगस डाॅक्टर गावागावांमध्ये फिरून रुग्णांची तपासणी करतात आणि भरमसाठ फी घेऊन रुग्णांची लुबाडणूकही करतात, चिरोली येथे सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, याठिकाणी डाॅक्टर आणि मुबलक प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहे, मात्र परिसरात घरपोच बोगस डाॅक्टर जात असल्यामुळे बहुतांश रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करीत नाही.
कोट
चिरोली व परिसरात बोगस डाॅक्टर फिरून रुग्णांवर उपचार करीत असल्याची चर्चा ऐकण्यात आली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे, काही दिवसांतच बोगस डाॅक्टरांवर कारवाई करू.
डाॅ. सुमेध खोब्रागडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, मूल