चिमुरात म्हशीने दिला द्विमुखी वगारीला जन्म
By Admin | Updated: August 30, 2015 00:40 IST2015-08-30T00:40:43+5:302015-08-30T00:40:43+5:30
येथील दुर्गा मंदिर परिसरातील दिवाकर नागोसे यांच्या म्हशीने शुक्रवारी द्विमुखी वगारीला जन्म दिल्याने

चिमुरात म्हशीने दिला द्विमुखी वगारीला जन्म
चिमूर : येथील दुर्गा मंदिर परिसरातील दिवाकर नागोसे यांच्या म्हशीने शुक्रवारी द्विमुखी वगारीला जन्म दिल्याने या वगारीला पाहण्यासाठी कुतुहलापोटी नागरिक गर्दी करीत आहेत.
दिवाकर नागोसे यांचा दुधाचा व्यवसाय असून ते म्हशी व शेळ्या पाळतात. त्यांच्या घराला लागून दुर्गा मंदिर आहे. ते दुर्गेचे निस्सिम भक्त आहेत. अशातच त्यांच्या म्हशीने द्विमुखी वगारीला जन्म दिला. विशेष म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सावसाकडे यांनी शस्त्रक्रीया करून या वगारीला जीवदान दिले. या वगारीला दोन तोंड, चार कान, चार डोळे, दान नाक व कपाळावर चंद्रकोर आहे. नागरिकांनी वगारीला पाहण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती. (शहर प्रतिनिधी)