चिमूर तालुक्यात २४७ बालके कुपोषणाच्या विळख्यात

By Admin | Updated: August 14, 2015 01:15 IST2015-08-14T01:15:18+5:302015-08-14T01:15:18+5:30

आजचे बालक उद्याचे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे या बालकांची काळजी घेण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे.

In Chimur taluka, 247 children are known for malnutrition | चिमूर तालुक्यात २४७ बालके कुपोषणाच्या विळख्यात

चिमूर तालुक्यात २४७ बालके कुपोषणाच्या विळख्यात

१४ बालके अतिकुपोषित : व्हीसीडीसीतून सुरू आहे उपचार
खडसंगी : आजचे बालक उद्याचे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे या बालकांची काळजी घेण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे. कुपोषणापासून मुलांची सुटका करण्यासाठी व आरोग्य सदृष्ठ ठेवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी आजही चिमूर तालुक्यातील २४७ बालकांना कुपोषणाच्या विळख्यात अडकल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे.
राज्यात सध्या चर्चेत असलेल्या एकात्मिक बालविकास मंत्रालयाचा चिक्कीमुळे जनसामान्यांपर्यंत ही चिक्की पोहचली आहे. याच मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बालविकास प्रकल्पातून शुन्य ते सहा वयोगटातील मुलांची काळजी घेतली जाते. चिमूर तालुक्यात २७७ अंगणवाडी केंद्र व १० मिनी अंगणवाडी केंद्रातून ० ते ३ वयोगटातील सहा हजार ६८४ मुले तर तीन ते सहा वयोगटातील सहा हजार ७३७ विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविला जात आहे.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार चिमूर तालुक्यात आजघडीला २४७ बालक कुपोषणाच्या विळख्यात आहेत. त्यामध्ये सॅमचे १४ बालक तर मैमचे २३ बालक आहेत. अतिकुपोषीत बालकांना या प्रकारातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे. सॅमच्या बालकांसाठी व्ही.सी.डी.सी. केंद्रातून उपचार करण्यात येत. या केंद्रातून बालकांना बुधवार व शुक्रवारला अंडी आणि केळी देण्यात येत आहेत. सोबतच आई-वडीलांना समुपदेशनद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तरी मात्र चिमूर तालुक्यात अतिकुपोषीत सॅमचे १४ बालक आहेत. त्यामुळे या बाल प्रकल्पामार्फत प्रयत्न करण्यात येत असले तरी मात्र ही संख्या कमी न झाल्याने प्रकल्पातून चालविलेल्या जाणाऱ्या उपाय योजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तर सॅम व मॅमची संख्या जरी कमी असली कुपोषणापासून मुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या उपाययोजनाही ‘फार्स’ तर नाही असा प्रश्न सर्वसाधारण नागरिकांकडून विचारला जात आहे. कुपोषणाची ही संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
चिमूर तालुक्यात अतिकुपोषीत १४ बालक असून या बालकांना व्हीसीडीसी केंद्रातुन पोषण आहार व हप्त्यातून दोन दिवस केळी व अंडी देण्यात येत आहेत. तर या बालकाच्या पालकांचे सुद्धा समुपदेशन करून प्रमाण कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २४७ बालके हे वजन आणि वयानुसार कुपोषीत आहेत.
- एस.एस. मुल्ला, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, चिमूर

Web Title: In Chimur taluka, 247 children are known for malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.