चिमूर क्रांतीजिल्हा कृती समितीचे उपोषण
By Admin | Updated: August 11, 2016 00:37 IST2016-08-11T00:37:38+5:302016-08-11T00:37:38+5:30
अनेक वर्षापासून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी रखडली आहे.

चिमूर क्रांतीजिल्हा कृती समितीचे उपोषण
अद्याप दखल नाही : दुसऱ्या दिवशीही सातजणांचे उपोषण
चिमूर : अनेक वर्षापासून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी रखडली आहे. या मागणीला गती यावी म्हणून नुकताच चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती व्यापारी मंडळ व सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तर क्रांती दिनापासून चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीने साखळी उपोषणास सुरुवात केली. बुधवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सात कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.
चिमूर क्रांती जिल्हा व्हावा, ही मागणी मागील ४६ वर्षापासून चिमूरकर करीत आहेत. मात्र शासन या मागणीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीने हे उपोषण सुरू केले. दुसऱ्या दिवशी राजू देवतळे, माधव बिरजे, राजू लोणारे, नरेंद्र दांडेकर, रमेश करारे, धनंजय बिंगेवार उपोषणास बसले आहेत. (शहर प्रतिनिधी)