शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

चिमूर पालिकेत सत्ताधारी काँग्रेस गटाला हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:20 AM

चिमूर नगर परिषदेवर मागील सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान आहे. असे असताना भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक सतीश जाधव यांनी व्युहरचना रचली. त्यामुळे विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवक सहभागीच झाले नाही.

ठळक मुद्देचारही सभापती पदांवर भाजपाचा कब्जा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर नगर परिषदेवर मागील सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान आहे. असे असताना भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक सतीश जाधव यांनी व्युहरचना रचली. त्यामुळे विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवक सहभागीच झाले नाही. परिणामी भाजपाच्या चारही नगरसेवकांची विषय समिती सभापती पदावर अविरोध निवड झाली. यामुळे काँग्रेस गटाला चांगलाच धक्का बसला असून भाजप गटात नवचैतन्य पसरले आहे.चिमूर नगर परिषदेच्या वार्षिक विषय समितीची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी सकाळी ११ वाजता पिठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली. दुपारी ३ वाजता सभापती पदाचे नामनिर्देशन पत्र भरण्यात आले. यामध्ये काँग्रेस गटाने विषय समिती निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहत नामनिर्देशन पत्र भरले नाही तर फक्त भाजपच्याच नगरसेवकांनी नामनिर्देशन पत्र भरले. त्यामुळे विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत बांधकाम सभापती नितीन कटारे, अर्थ व नियोजन सतीश जाधव, समाजकल्याण भारती गोडे तर पाणी पुरवठा सभापतीपदी हेमलता नन्नावरे यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी भय्यासाहेब बेहरे यांनी केली.आमदारांची यशस्वी खेळीचिमूर पालिकेत भाजपाचे सहा, काँग्रेसचे पाच व अपक्ष चार असे नगरसेवक निवडून आले. तेव्हा आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी भाजप व अपक्ष असे मिळून एक गट तयार केला होता. गुरुवारी झालेल्या सभापतीच्या निवडणुकीत अपक्षांना काँग्रेससोबत जाता येत नव्हते. त्यामुळे काँग्रेसचा पराभव निश्चित होता. त्यामुळे ते निवडणुकीपासून दूर राहिले.काँग्रेस नगरसेवक गैरहजरगुरुवारी नगर परिषद सभागृहात घेण्यात आलेल्या विषय समिती सभापती निवडणुकीच्या विशेष सभेत काँग्रेसचे नगराध्यक्ष गोपाल झाडे, उपाध्यक्ष तुषार शिंदे, सदस्य कदिर शेख, अ‍ॅड. अरुण दुधनकार, कल्पना इंदूरकर, श्रद्धा बंडे तसेच शिवसेनेचे उमेश हिंगे, सीमा बुटके हे गैरहजर होते.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस