शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चिमूर, सावलीत काँग्रेस तर पोंभुर्णा येथे भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:50 PM

नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने मंगळवारी चिमूर येथील नगरपालिकेत तर सावली व पोंभुर्णा येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. चिमूर पालिकेत सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून नगराध्यक्षपदी काँग्रेसचे गोपाल झाडे व उपाध्यक्षपदी तुषार शिंदे यांची निवड झाली. तर सावली येथे काँग्रेसने आपला गड कायम राखत नगराध्यक्षपदी विलास यासलवार तर उपाध्यक्षपदी भोगेश्वर मोहुर्ले यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच पोंभुर्णा येथे भाजपने आपला गड राखत नगराध्यक्षपदी श्रेता वागकर व उपाध्यक्षपदी रजिया कुरेशी यांची निवड झाली.

ठळक मुद्देचिमुरात सत्तापालट : नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर/सावली/पोंभुर्णा : नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने मंगळवारी चिमूर येथील नगरपालिकेत तर सावली व पोंभुर्णा येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. चिमूर पालिकेत सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून नगराध्यक्षपदी काँग्रेसचे गोपाल झाडे व उपाध्यक्षपदी तुषार शिंदे यांची निवड झाली. तर सावली येथे काँग्रेसने आपला गड कायम राखत नगराध्यक्षपदी विलास यासलवार तर उपाध्यक्षपदी भोगेश्वर मोहुर्ले यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच पोंभुर्णा येथे भाजपने आपला गड राखत नगराध्यक्षपदी श्रेता वागकर व उपाध्यक्षपदी रजिया कुरेशी यांची निवड झाली.चिमूर नगरपालिकेत यापुर्वी भाजपची सत्ता होती. कार्यकाळ संपल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून गोपाल झाडे, भाजपाकडून भारती गोडे (जांभूळे) यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सीमा बुटके, भाजपा समर्थीत तुषार काळे व काँग्रेस समर्थीत तुषार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र सत्ताधारी भाजपकडे असलेले अपक्ष नगरसेवक आपल्याकडे वळविण्यात कॉग्रेसला यश आल्याने नगराध्यक्षपदी गोपाल झाडे व उपाध्यक्षपदी काँग्रेस समर्थीत उमेदवार तुषार शिंदे नऊ विरूद्ध सात अशा मताने विजयी झाले.निवडणूक प्रक्रियेत नगरसेवकांचे हात उंचावून मतदान घेण्यात आले. पिठासीन अधिकारी म्हणून कल्पना निळ, मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांनी काम पाहिले.तुषार शिंदेना काँग्रेसचा हातनिवडणूक प्रक्रीयेदरम्यान चिमूरचे नगरसेवक तुषार शिंदे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मतदान प्रक्रियेची वेळ होत असतानाच त्यांना त्याच अवस्थेत रुग्णवाहिकेद्वारे आणले जात होते. तेव्हा रुग्णालयाच्या आवारात भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिका अडवून तुषार शिंदे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. मात्र ठाणेदार दिनेश लबडे यांनी हस्तक्षेप केल्याने पोलीस बंदोबस्तात शिंदे यांना मतदानासाठी सभागृहात आणण्यात आले. यापुर्वी तुषार शिंदे भाजप गटाकडून अडीच वर्ष उपाध्यक्ष होते. मात्र यावेळेस त्यांनी काँग्रेसला साथ देत उपाध्यक्षपदी विजयी झाले.पोंभुर्णा येथे महिला राजपोंभूर्णा : येथील नगराध्यक्षपदी भाजपच्या श्वेता महेंद्र वनकर यांची तर उपाध्यक्षपदी भाजपच्या रजीया कुरेशी यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्षपद एस.सी. महिलासाठी राखीव असल्याने काँग्रेसच्या सविता गेडाम व श्वेता वनकर या स्पर्धेत होत्या. सविता गेडाम यांना ६ मते तर श्वेता वनकर यांना ११ मते मिळाली. तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अतिक अहमद कुरेशी यांना ६ तर रजिया इकबाल कुरेशी यांना ११ मते मिळाली.विलास यासलवार, भोगेश्वर मोहुर्ले अविरोधसावली : येथील नगराध्यक्षपदी काँग्रेसचे विलास यासलवार तर उपाध्यक्षपदी भोगेश्वर मोहुर्ले यांची अविरोध निवड करण्यात आली. सावली नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर बसपा एक व अपक्ष एक असे १७ नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष पदाकरिता तीन नामांकन दाखल झाले होते. मात्र निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल करणारे गुणवंत सुरमवार आणि निलीमा सुरमवार यांनी आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे विलास यासलवार यांची अविरोध निवड झाली. तर भोगेश्वर मोहुर्ले यांचीसुद्धा उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली. यावेळी मावळत्या नगराध्यक्ष रजनी भडके, गटनेता छत्रपती गेडाम, शिला शिंदे, संगिता गेडाम, चंद्रकांत संतोषवार, योगीता बुगदलवार आदी उपस्थित होते.