अपहरण करून बालकाचा खून
By Admin | Updated: September 17, 2016 01:31 IST2016-09-17T01:31:07+5:302016-09-17T01:31:07+5:30
येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलाला गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी नेण्याच्या बहाण्याने नेवून खून केल्याची घटना

अपहरण करून बालकाचा खून
दुर्गापूर : येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलाला गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी नेण्याच्या बहाण्याने नेवून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिराने उघडकीस आली. आरोपीने खुनाची कबुली दिली असून वृत्त हाती येईपर्यंत पोलिसांकडून प्रेत ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची होती.
सोनु भास्कर सहारे असे या दुर्देवी मुलाचे नाव आहे. त्याचे आईवडील मजुरी करतात. गुरूवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या देवा भुजबळ देवतरे (२२) याने सोनुला चंद्रपुरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी म्हणून बाहेर नेले. विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालते. त्यामुळे घरच्यांनी विशेष काळजी केली नाही. मात्र शुक्रवारी सकाळी सोनुच्या वडीलांना मोबाईलवरून कॉल आला. सोनु आपच्या ताब्यात असून परत हवा असल्यास चार लाख रूपयांची मागणी झाली. त्यामुळे भास्कर सहारे यांनी सायंकाळी दुर्गापूर पोलिसात धाव घेतली.
माहितीवरून पोलिसांनी देवा देवतारे याला शोधून काढले व ताब्यात घेतले. अखेर त्याने सोनुचा खून केल्याची कबुली रात्री उशिरा दिली. वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांचा ताफा आरोपीला घेवून सोनुच्या शोधासाठी रवाना होण्याच्या तयारीत होता. या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. (वार्ताहर)