बालोद्यानाला समस्यांचे ग्रहण

By Admin | Updated: March 29, 2016 02:27 IST2016-03-29T02:27:12+5:302016-03-29T02:27:12+5:30

येथील रेल्वे वसाहतीतील बालोद्यानाला अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे. रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने

Childhood Eclipse Problems | बालोद्यानाला समस्यांचे ग्रहण

बालोद्यानाला समस्यांचे ग्रहण

नागभीड : येथील रेल्वे वसाहतीतील बालोद्यानाला अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे. रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने बालक व पालकांनी या बालोद्यानाकडे पाठ फिरविली आहे. यामुळे संबंधित बालोद्यानास बकालरूप प्राप्त होवून केवळ शोभेचे ठरले आहे. या बाबीकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बालकांच्या विकासाकरिता रेल्वे प्रशासनाने सन २००४ मध्ये नागभीड (सुलेझरी) येथील रेल्वे वसाहतीत बालोद्यानाची निर्मिती केली. नागभीड शहरात व आसपासच्या परिसरात एकही बालोद्यान नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बालकांसहित रेल्वे प्रशासनाचे बालोद्यान इतरही बालकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले. मात्र हे औटघटकेचे ठरले.
बालोद्यानाची निर्मिती झाल्यापासून काही वर्ष रेल्वे प्रशासनाने व्यवस्थित देखभाल केली. परंतु, सद्यपरिस्थितीत या बालोद्यानाची रेल्वे प्रशासनाकडून देखभाल होत नसल्याने बकाल स्वरूप आले आहे. बालोद्यानाच्या मैदानात गवत व बाभळीची झाडे वाढली असून ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य आहे. यामुळे मुलांच्या अपघाताची शक्यता बळावली आहे. मुलांच्या खेळाचे विविध साहित्य तुटलेले असून बैठकीची लोखंडी बाके रंगरंगोटीअभावी गंजत आहेत. बालोद्यानातील विद्युत दिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधार असते. (शहर प्रतिनिधी)

रेल्वे स्थानकाचे सांैदर्यीकरण
मात्र बालोद्यानाकडे दुर्लक्ष
४एकीकडे रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे व विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर असताना रेल्वे प्रशासनाचे अधिकारी बालोद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याने याबाबत जनतेत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. देखभालीअभावी संबंधीत बालोद्यान केवळ शोभेचे ठरले आहे. रेल्वे प्रशासनाने बालोद्यानाच्या समस्येकडे लक्ष देऊन बालोद्यानास नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Childhood Eclipse Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.