मूल रस्त्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:08+5:302020-12-22T04:27:08+5:30

नागरिकांची गैरसोय : काम त्वरित करून दिलासा द्याचंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून सुरु असलेले मूल रोडचे बांधकाम अद्यापहू पूर्ण ...

Child road work slowly | मूल रस्त्याचे काम संथगतीने

मूल रस्त्याचे काम संथगतीने

नागरिकांची गैरसोय : काम त्वरित करून दिलासा द्याचंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून सुरु असलेले मूल रोडचे बांधकाम अद्यापहू पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बांधकामामुळे अनेकांचे अपघातही होत आहे. त्यामुळे रस्त्याचे बांधकाम त्वरत करून दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे यांनी केली आहे.

रामनगर पोलीस स्टेशन समोर अनेक दिवसांपासून रस्त्यावर खड्डे पडले आहे. यातच रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने बंगाली कॅम्प मागेर् मुल आणि बल्लारपूरकडे जड वाहनांची सतत वर्दळ असते. तुकूम, दुर्गापूर आणि उर्जानगरकडून ये-जा करणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक एका बाजूने सुरु असल्याने येथे वाहनांची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक एका बाजूने सुरु असल्याने येथे वाहनांची कोंडी होत आहे. वाहतूक शाखा कायार्लयाजवळही बांधकाम करण्याकरिता रस्ता खोदला आहे. तेही काम कासवगतीने सुरु आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता या मार्गाचे काम त्विरत पूर्ण करण्याची मागणी धांडे यांनी केली आहे.

Web Title: Child road work slowly