मुलानेच केला जन्मदात्याचा खून

By Admin | Updated: August 8, 2015 01:06 IST2015-08-08T01:06:36+5:302015-08-08T01:06:36+5:30

अनैतिक संबंधाच्या कारणातून घरगुती वाद विकोपाला गेला. त्यात मुलगा करण अल्लीवार (२१) याने वडील बुधा नरसू अल्लीवार ...

The child has borne the murderer | मुलानेच केला जन्मदात्याचा खून

मुलानेच केला जन्मदात्याचा खून

घोसरी: अनैतिक संबंधाच्या कारणातून घरगुती वाद विकोपाला गेला. त्यात मुलगा करण अल्लीवार (२१) याने वडील बुधा नरसू अल्लीवार यांच्या डोक्यावर जबर प्रहार करीत सुरीने गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना नांदगाव (घोसरी) येथे गुरूवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मूल पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बेंबाळ चौकीच्या हद्दीतील नांदगाव (घोसरी) येथील बुधा नरसू अल्लीवार (५०) याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यातून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत. सततच्या वादामुळे मुलगा करण याचा राग अनावर झाल्याने रात्रीची शांतता हेरुन त्याने घरातील लोखंडी रॉडने पित्याच्या डोक्यावर जबर प्रहार केला. त्यानंतर त्याच्या गळ्यावर सुरीने सपासप वार केले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडून बुधाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर नांदगावात खळबळ उडाली. पोलीसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कोहरे, सहा. फौजदार विजय संगमवार करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The child has borne the murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.