छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:45+5:302021-02-23T04:43:45+5:30

वरोरा : येथील छावा ग्रुपच्या वतीने आनंदवन चौकाला लागून असलेल्या ग्राऊंडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे ...

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebration | छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव

वरोरा : येथील छावा ग्रुपच्या वतीने आनंदवन चौकाला लागून असलेल्या ग्राऊंडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यात श्री छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पित करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच महाराजांचे देखावे तयार करून पालखी काढण्यात आली. आणि सांस्कृतिक व व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष एहतेश्याम अली होते. प्रमुख पाहुणे म्हणून छोटूभाई शेख, बसंतकुमार सिंग काळे, नगरसेवक दिनेश यादव, अंकुश आगलावे, सुधाकर कुंकुले उपस्थित होते. संचालन अरुण कापटे यांनी केले. यावेळी छावा ग्रुपचे आकाश लिगाडे, तुषार कडू, राहुल ननावरे, निहाल मते, समिर देठे, हर्षद बोलणे, अमित नन्नावरे, प्रणय ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebration