शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

छगन भुजबळांनी चाखला शिवभोजनात पाटोडी रस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 20:19 IST

Chandrapur News अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा आज (दि.१८) भिवापूर बसस्थानक परिसरात थांबला. येथे पोहचताच भुजबळ थेट लगतच्याच शिवभोजन केंद्रात शिरले आणि केंद्राअंतर्गत सोयी सुविधांची माहिती घेत, शिवभोजनाचा स्वाद घेतला.

चंद्रपूर: जिल्ह्यातील मूल येथे जातांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा आज (दि.१८) भिवापूर बसस्थानक परिसरात थांबला. येथे पोहचताच भुजबळ थेट लगतच्याच शिवभोजन केंद्रात शिरले आणि केंद्राअंतर्गत सोयी सुविधांची माहिती घेत, शिवभोजनाचा स्वाद घेतला. (Chhagan Bhujbal tasted Patodi gravy and Varana at Shivbhojana)गोरगरीब गरजूंना केवळ १० रूपयांत मिळणारे भोजन खरंच चविष्ट आणि गुणवत्ता प्राप्त आहे का याची चाचपणी त्यांनी यावेळी केली. भुजबळ आज (दि.१८) नागपूर येथून उमरेड-भिवापूर मार्गे चंद्रपूरला जाण्याकरिता निघाले होते. या दरम्यान भिवापूर येथील शिवभोजन केंद्राला भेट देणार असल्याची माहिती प्रशासनाला व पक्ष पदाधिका-यांना होती. दरम्यान भुजबळ यांनी वक्रतुंड शिवभोजन केंद्राला भेट देत, केंद्र चालक शिरीष गुप्ता यांच्याशी संवाद साधला. सोयी सुविधांची पाहणीही केली.

नागरिकांना मिळणारे भोजन स्वादीष्ट व गुणवत्ता प्राप्त आहे का? याची चापणी करण्याकरीता भुजबळ यांनी स्वत: शिवभोजनाचा स्वाद घेतला. यात पाटोडीची भाजी, वरण, भात आणि पोळीचा समावेश होता. आ. राजू पारवे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, शिवसेनेचे तालुका प्रमुख संदिप निंबार्ते, तहसीलदार अनिरूध्द कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर आदी उपस्थित होते. पुढे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने छगन भुजबळ यांचा राष्ट्रीयमार्गावरच सत्कारही करण्यात आला.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळshiv bhojnalayaशिवभोजनालय