शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
3
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
4
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
5
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
6
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
7
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
8
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
9
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
10
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
11
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
12
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
13
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
14
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
15
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
16
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
17
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
18
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
19
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
20
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
Daily Top 2Weekly Top 5

जलस्त्रोतांची होणार रासायनिक जैविक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

स्त्रोतांच्या १० मीटर परिघात गेल्यावर अ‍ॅप सुरू करून त्याद्वारे स्त्रोत जिओ टॅग केल्या जाते. त्यानंतर छायाचित्रसह नमुना घेतला जातो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासायनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले, याची माहिती मिळते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्थानिक जलस्त्रोतांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या.

ठळक मुद्देउद्दिष्ट्यपूर्तीसाठी यंत्रणा सज्ज : ग्रामपंचायतींना देणार तीन प्रकारचे कार्ड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील जलस्त्रोतांची मोबाईल अ‍ॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरूवात करण्यात आली. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ७ हजारांपेक्षा अधिक स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम जैविक तपासणी अभियान राबविल्या जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे ८ हजार जलस्त्रोत असून, या सर्व स्त्रोतांची तपासणी केली जाणार आहे. १ आॅक्टोबरपासून अभियानाला सुरूवात झाली. रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात १०० टक्के पूर्ण करण्यात यावे. याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यकांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाईल अ‍ॅपद्वारे गोळा करावयाचे आहेत. या पाणी नमुन्यांची रासायानिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोगशाळांतून करण्यात येणार आहे. या अभियानाबरोबरच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत आरोग्य विभागाकडून केल्या जाईल. जलस्त्रोतांच्या सर्वेक्षणादरम्यान प्रपत्र अ, ब, क, तयार करून संबंधीत आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आले असून त्याद्वारे स्त्रोतांचा परिसर, योजनेमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीला पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित करण्यात येणार आहे. त्या आधारे ग्रामपंचायतींना लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तालुकास्तरीय यंत्रणेची बैठक घेऊन शासन निकषाप्रमाणे स्वच्छता सर्वेक्षण करावे व त्याची फेरपडताळणी करण्याचे निर्देश दिले.ग्रामपंचायतींची जबाबदारीस्त्रोतांच्या १० मीटर परिघात गेल्यावर अ‍ॅप सुरू करून त्याद्वारे स्त्रोत जिओ टॅग केल्या जाते. त्यानंतर छायाचित्रसह नमुना घेतला जातो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासायनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले, याची माहिती मिळते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्थानिक जलस्त्रोतांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या.अशी होणार तपासणीग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांचे सॅटेलाईटद्वारे टॅग करणेसाठी शासनाने नागपूर येथील एमआरएससी या संस्थेला जबाबदारी दिली आहे. जिओफेन्सिंग हे एक मोबाईल अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने गोळा करण्यासाठी वापरतात.

टॅग्स :Waterपाणी