पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून २०६ लाभार्थ्यांना धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:30+5:302021-01-13T05:12:30+5:30
चंद्रपूर : शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतून महानगर पालिकेने प्रत्येकी १० हजार ...

पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून २०६ लाभार्थ्यांना धनादेश
चंद्रपूर : शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतून महानगर पालिकेने प्रत्येकी १० हजार रुपयाप्रमाणे २०६ जणांना महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते सोमवारी ज्युबिली हायस्कूलसमोरील बीपीएल कार्यालयात वाटप करण्यात आले.
यावेळी आयुक्त राजेश मोहिते, गटनेता वसंता देशमुख, विरोधी पक्षनेते सुरेश महाकुळकर, माजी महापौर अंजली घोटेकर, उपायुक्त संतोष कंधेवार, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक शंभुनाथ झा, समाजकल्याण अधिकारी सचिन माकोडे व राष्ट्रीयीकृत बँक शाखांचे स्थानिक प्रबंधक उपस्थित होते.
महापौर कंचर्लावार म्हणाल्या, मनपाअंतर्गत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना राबविण्यासाठी राज्यातून आघाडी घेण्याचा प्रयत्न आहे. या योजनेतून मनपा क्षेत्रातील एकही पथविक्रेता वंचित राहू नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करणार आहे. आयुक्त मोहिते म्हणाले. अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेले पथविक्रेते शहरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता करण्यात मोठी भूमिका बजावतात. मनपाच्या वतीने जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक झा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँक व्यवस्थापक चंद्रकांत दांडेक, डी. डी. नंदनवार, अनुप दलाल, प्रियादशे, चेतन काळे, आलोक चौधरी, सुनील शहारे, सिंह, एस. आर. वाकडे, पवन वर्मा, नितीन मडामे उपस्थित होते. संचालन सुषमा करमरकर, प्रास्ताविक रोशनी तपासे यांनी केले. आयोजनासाठी बांते, मेश्राम, खडसे, लोणारे, पाटील, मून, खडसे यांनी सहकार्य केले.
३,९०० पथविक्रेत्यांनी केले अर्ज
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत चंद्रपूर शहरातील ३,९०० पथविक्रेत्यांनी अर्ज केले होते. आतापर्यंत १११० पथविक्रेत्यांच्या प्रकरणांना मंजुरी मिळाली. यापैकी ७०३ लाभार्थ्यांना कर्ज वितरित करण्यात आले आहे. शहरातील बँकांनी १११० जणांचे कर्ज मंजूर केले आहे.