नैसर्गिक आपादग्रस्तांना धनादेश वितरण

By Admin | Updated: November 9, 2014 22:31 IST2014-11-09T22:31:10+5:302014-11-09T22:31:10+5:30

येथील मौलाना आझाद वॉर्डात एका महिलेचा अतिवृष्टीदरम्यान घर कोसळून जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबीय उघड्यावर आले. त्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने शासनाने एक लाख ५० हजार

Check distribution of natural disasters | नैसर्गिक आपादग्रस्तांना धनादेश वितरण

नैसर्गिक आपादग्रस्तांना धनादेश वितरण

बल्लारपूर : येथील मौलाना आझाद वॉर्डात एका महिलेचा अतिवृष्टीदरम्यान घर कोसळून जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबीय उघड्यावर आले. त्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने शासनाने एक लाख ५० हजार रुपये अनुदान अलिकडेच मंजूर केले. तहसील कार्यालयाच्या वतीने नैसर्गिक आपादग्रस्तत महिलेला धनादेश प्रभारी तहसीलदार पी. डी. वंजारी यांच्या हस्ते शुक्रवारी देण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, तलाठी एम. बी. कन्नाके, तहसील कार्यालयाचे लिपीक दत्तराज कुळसंगे, शैलेश धात्रक, लाभार्थी महिला यशोधरा लोखंडे, राजेश लक्कावार यांची उपस्थिती होती.
बल्लारपूर शहरात ७ सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे येथील मौलाना आझाद वॉर्डातील वच्छलाबाई मसाराम लोखंडे यांचे राहते घर कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेचा पंचनामा तलाठी एम. बी. कन्नाके यांनी करुन नैसर्गिक आपत्तीदरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्या प्रकरणाला नुकतीच मंजुरी मिळाली. मृत महिलेची विधवा सून यशोधरा प्रविण लोखंडे हिला वरसदार म्हणून एक लाख ५० हजार रुपयांचा धनादेश प्रभारी तहसीलदार पी. डी. वंजारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यामुळे मृत महिलेच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमाचे संचालन डी.एन. कुळसंगे यांनी तर आभार शैलेस धात्रक यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Check distribution of natural disasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.