दाभोळकर, पानसरे खुनाचा तपास करा
By Admin | Updated: August 31, 2016 00:45 IST2016-08-31T00:45:46+5:302016-08-31T00:45:46+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खुनाला ३६ महिने आणि त्याच ...

दाभोळकर, पानसरे खुनाचा तपास करा
ऊर्जानगरात सभा : महाराष्ट्र अंनिसची मागणी
चंद्रपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खुनाला ३६ महिने आणि त्याच धर्तीवर ज्येष्ठ समाजसुधारक काम्रेड गोविंद पानसरे यांचे खुनाला १८ महिने होऊनही त्यांचे मारेकरी व मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटच आहेत. महाराष्ट्र शासनाने या दोघांच्या खुनाच्या तपासाबाबत अक्षम्य दिरंगाई केलेली असल्यामुळे डॉ. दाभोळकर यांचे तिसऱ्या स्मृतीदिनी ऊर्जानगर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते व समितीच्या हितचिंतकांनी तीव्र निषेध केला.
पुरोगामी महाराष्ट्रातील संत व समाजसुधारकांच्या कार्याचे स्मरण करुन या दोघाच्या खुनांचा तपास यापुढे महाराष्ट्र शासनाने विनाविलंब लावावा, अशी मागणी या सभेमध्ये करण्यात आली. तसेच डॉ. दाभोळकर व पानसरे यांच्या मारेकऱ्यांना व मुख्य सूत्रधारांना कधी पकडणार, या आशयाची पत्रे लिहून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपस्थितांनी पाठविली आहे. या सभेमध्ये जाधव यांनी मार्गदर्शन केले. सभेचे संचालन ऊर्जानगर शाखेचे कार्यवाह नारायण चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)