संगणकीकृत सातबारासाठी प्रत्येक गावात चावडी वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 00:41 IST2017-05-17T00:41:14+5:302017-05-17T00:41:14+5:30

महाराष्ट्र शासनाने नुकतेच महसुल विभागांतगृत संगणीकृत सातबारा चावडी वाचन आणि गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवार या दोन महत्वाच्या योजना सुरू केल्या.

Chawadi reading in every village for computerized sewage | संगणकीकृत सातबारासाठी प्रत्येक गावात चावडी वाचन

संगणकीकृत सातबारासाठी प्रत्येक गावात चावडी वाचन

शेतकऱ्यांचा प्रतिसाद : गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : महाराष्ट्र शासनाने नुकतेच महसुल विभागांतगृत संगणीकृत सातबारा चावडी वाचन आणि गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवार या दोन महत्वाच्या योजना सुरू केल्या. सदर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभाग भद्रावतीद्वारे पालिका सभागृहात आज मंगळवारी लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी तहसीलदार सचिन कुमावत, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, तलाठी व कोतवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
१५ मे ते १५ जुन या कालावधीपर्यंत प्रत्येक गावात चावडी वाचन होणार आहे. सुररुवातीच्या आॅनलाईन सातबारामध्ये काही चुका असल्यास त्या याद्वारे दुरूस्त करण्यात येणार आहे. दररोज प्रत्येक मंडळातील एका गावात वाचन होणार आहे. ग्रा.पं. कार्यालय, जि.प. शाळा आंगणवाडी किंवा चावडी येथे सकाळी ८ वाजता चावडी वाचनाला सुरुवात होईल. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी व पर्यवेक्षण अधिकारी म्हणून तहसिलदार, नायब तहसिलदार अव्वल कारकुन हे उपस्थित राहतील. उपस्थित शेतकऱ्यांना संगणीकृत सातबाराचे नोंट्री वाचून दाखविल्या जाईल. दुरूस्ती असल्यास लाल रंगाने सातबारावर दुरूस्ती दर्शविण्यात येणार आहे. चावडी वाचनाला उपस्थित नसणाऱ्या शेतकऱ्यासाठी त्यांचे घरी जावून संगणीकृत सातबाऱ्याच्या नोंट्री वाचुन दाखविल्या जाईल. शेतकरी व खातेदारांनी सातबारा तपासून स्वाक्षरी करून तलाठी यांना सातबारा वर्ग करायचा आहे. त्यानंतर १५ जुन ते ३१ जुलै या कालावधीत नोंदविण्यात आलेल्या सातबारावरील सर्व दुरूस्त्या संगणकात करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सचिव कुमावत यांनी उपस्थितांना सांगीतल. हीच पध्दत शहरालाही लागू राहील, असे नगराध्यक्ष अनिल धानोरकर म्हणाले.
१ आॅगस्टपासून संपूर्णपणे संगणीकृत सातबाराचा वापर सुरू होणार आहे. या चावडी वाचनाच्या मोहीमेमुळे शेतकऱ्यांना गावात आपला संगणीकृत सातबारा पहायला मिळणार आहे. तसेच दुरूस्ती असल्यास तीदेखिल सुचविता येणार आहे. भविष्यात सातबारातील चुका काढण्यासाठी या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे.
भद्रावती तालुक्यातील प्रत्येक गावांसाठी दिनाक, वेळ व ठिकाण यानुसार कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. १६ मे रोजी कुचना, मुधोली, धोनाड, बरांज व सागरा येथे चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
या सोबतच तालुक्यातील लघुपाटबंधारे तलाव, मामा तलाव, पाझर तलाव आदींमधून गाळ काढणे, याकरिता गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मुखत्वेकरून तलावात, धरणात साचलेला गाळ काढून पाणी साठविण्यासाठी क्षमता वाढवणे व काढलेल्या मातीचा शेतकऱ्यांच्या शेतात उपयोग करणे, असा दुहेरी फ ायदा यात आहे.० ते २५० हे सिंचन क्षमता असलेल्या धरणाचा तलावाचा यात समावेश आहे. फ क्त शेतकऱ्यांच्या शेतात त्यांना माती घेऊन जाता येईल. वैयक्तीक शेतकरी, ग्रामपंचायत, कंपनीद्वारे उत्खनन करण्यात येईल. मातीच्या व्यावसायिक वापर करता येणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार भद्रावती यांच्याकडे अर्ज सादर करावे, अर्जाची उपअभियंता यांच्यामार्फत तपासणी करून प्रस्ताव सादर केला जाईल.

Web Title: Chawadi reading in every village for computerized sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.