वेकोलिच्या त्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:26+5:302021-04-02T04:29:26+5:30

प्रकल्पग्रस्त आशा घटे आत्महत्या प्रकरण : राजुरा तेली समाजाची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क सास्ती : वेकोलिच्या पौनी ३ प्रकल्पातील ...

Charge that officer of Vekoli with manslaughter | वेकोलिच्या त्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वेकोलिच्या त्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

प्रकल्पग्रस्त आशा घटे आत्महत्या प्रकरण : राजुरा तेली समाजाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

सास्ती : वेकोलिच्या पौनी ३ प्रकल्पातील सास्ती येथील प्रकल्पग्रस्त १९ वर्षीय युवती आशा तुळशीराम घटे हिला मानसिक त्रास देऊन आत्महत्येला प्रवृत्त केल्यामुळे वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलय्या यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन तेली समाज, राजुराच्यावतीने राजुराचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांना देण्यात आले.

सास्ती येथील मृतक आशा तुळशीराम घटे हिच्या वडिलांची शेती वेकोलिमार्फत संपादित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने स्व. आशा घटे ही वेकोलिमार्फत लाभार्थी असल्यामुळे नोकरी संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता वेकोलिचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलय्या यांनी बोलावल्यानुसार धोपटाळा येथील वेकोलि कार्यालयात गेली होती. यावेळी जी. पुलय्या यांनी आशा घटे हिला अपमानास्पद वागणूक दिली व त्यामुळे तिच्या मनावर परिणाम झाला व तिने सास्ती येथील घरी येत विषप्राशन केले होते, असे निवेदनात म्हटले आहे. घटे परिवारातील सदस्यांनीही यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचे निवेदन संजय ऋषीजी घटे, तुळशीराम ऋषीची घटे, पी. एस. गंधारे, डी. एन. बेले, प्रा. पी. आर. शेंडे, महादेव तपासे, सचिन शेंडे, राकेश कुंडले, संतोष घटे, श्यामराव काटवले, उमेश कुंडले, अक्षय इटणकर यांनी दिले.

Web Title: Charge that officer of Vekoli with manslaughter