प्रशासकीय बदल्यापूर्वी विनंती बदल्या करा

By Admin | Updated: May 15, 2014 23:27 IST2014-05-15T23:27:39+5:302014-05-15T23:27:39+5:30

शिक्षकांच्या उन्हाळी बदल्यांची हालचाल जिल्हा परिषदेमध्ये सुरू झाली आहे. त्यासोबतच शिक्षकांच्या मनातील अस्वस्थताही वाढू लागली आहे. मागील वर्षीचे बदली सत्र

Change the request before admin transfers | प्रशासकीय बदल्यापूर्वी विनंती बदल्या करा

प्रशासकीय बदल्यापूर्वी विनंती बदल्या करा

चंद्रपूर : शिक्षकांच्या उन्हाळी बदल्यांची हालचाल जिल्हा परिषदेमध्ये सुरू झाली आहे. त्यासोबतच शिक्षकांच्या मनातील अस्वस्थताही वाढू लागली आहे. मागील वर्षीचे बदली सत्र काहींसाठी सुखद तर काहींसाठी दु:खद ठरले. बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत तक्रारीचा ढीगही प्रशासनाकडे जमा झाला. अशा प्रकारचा अन्याय यावर्षी होऊ नये यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी संघटनेचे प्रस्ताव वरिष्ठांकडे मार्गदर्शनास्तव पाठविण्याचे व आपसी बदलीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

यावर्षी राज्यभर कर्मचार्‍यांच्या बदल्या मागील वर्षीच्या १८ एप्रिलच्याच शासन निर्णयाच्या आधारावर होणार आहेत. मागील वर्षी शासन निर्णयात फक्त नंदूरबार व गडचिरोलीच्या मोजक्या सात तालुक्यासाठी दिलेल्या बदली नाकारण्याची सवलत चंद्रपूर जिल्ह्यातही बहाल करण्यात आली. त्यामुळे बदल प्रक्रियेचे स्वरूपच बदलून गेले व अनेकांवर अन्याय झाला. तसेच यामुळे त्याच त्या शिक्षकाची प्रत्येकवर्षी बदली होणार आहे. त्यामुळे इतर सेवाज्येष्ठ कर्मचारी, आहे त्याच जागेवर राहतील. हा अन्याय दूर करण्याच्या विनंतींसह अनेक वर्षापासून बदलीसाठी वाट पाहत असलेल्या शिक्षकांना प्रशासकीय बदल्याअभावी विनंती बदल्याची संधी द्यावी, प्रशासकीय बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणाची संधी सर्वच संवर्गासाठी देण्यात यावी, अपंग, विधवा, ५३ वर्षावरील कर्मचारी यांना प्राधान्याने विनंतीने बदलीची संधी देण्यात यावी, नक्षलग्रस्त आदिवासी व बिगर नक्षलग्रस्त यांची स्वतंत्र बदली करण्यात यावी, आपसी बदली अर्जासाठी १८ मेपर्यंंत मुदत वाढवून द्यावी, बिगर आदिवासी तालुक्यातील काही आदिवासी गावांनाही सर्व सवलती लागू कराव्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित ३३१ शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी, सेवानवृत्त शिक्षकांची निवड श्रेणी, ६३ शिक्षणसेवक व वस्तीशाळा निमशिक्षक नियमित प्रकरणे, ७६ अप्रशिक्षित शिक्षक वेतन श्रेणी, आंतरजिल्हा बदली, उच्च शिक्षक अर्हता परवानगी, घरभाडे भत्ता आदी समस्याही तात्काळ सोडविण्याचे आश्‍वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिले.

चर्चेमध्ये पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विजय भोगेकर, जिल्हा सरचिटणीस हरीश ससनकर, कोषाध्यक्ष दीपक वर्‍हेकर यांच्यासह गणपत विधाते, विवेक इत्तडवार, सुभाष अडवे, देवराव दिवसे, दुष्यंत मत्ते हे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Change the request before admin transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.