शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

देशात चंद्रपूर अव्वल ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:51 IST

जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, गोविंद सारडा, रामू तिवारी, अजय मस्के, मोहन कललीवार, आशिष देवतळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरच्या नावात आद्याक्षर 'च' आहे. याचा अर्थ कोणत्याही उद्दिष्टांना पूर्ण करावाच लागेल असा आहे. त्यामुळे ध्येय निश्चित करा. यासाठी २४ तासांचे योग्य नियोजन करा. उद्योगपतीचा मुलगा असो अथवा बाबुपेठमधला सामान्य विद्यार्थी असो, मेहनत करण्यासाठी २४ तास प्रत्येकाला मिळतात. त्यामुळे या २४ तासांचा सद्पयोग करणारा यशाला गवसणी घालतो, हे सूत्र कायम लक्षात ठेवा, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.चंद्रपूरमधून आॅलंम्पिकपटू घडविणाऱ्या मिशन शक्ती आणि सनदी अधिकारी घडविणाºया मिशन सेवा या दोन उपक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले.ज्यांच्यामध्ये उपजत कलागुण व कौशल्य आहे त्यांना मिशन शक्तीच्या माध्यमातून आॅलंम्पिकसाठी जिल्ह्यामध्ये सिद्ध केले जात आहे. मात्र कठोर परिश्रम आणि २४ तासांची योग्य आखणी करणाºया विद्यार्थ्यांसाठी मिशन सेवा हा उपक्रम चंद्रपूरचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी वाट पाहत आहे. भारतात कुठेही गेलो तरी त्या ठिकाणच्या वरिष्ठ पदावरचा एक मराठी आवाज मला ऐकायला आला पाहिजे की, 'भाऊ मी चंद्रपूरचा आहे ' तो दिवस माझ्यासाठी गौरवाचा असेल. महाराष्ट्रामध्ये आगामी काळात ७२ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यावेळी प्रत्येकाने कामी लागा. या मेगा भरतीमध्ये चंद्रपूरचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले.विविध विद्या शाखांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शहरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.आदिवासी युवकांच्या ‘मिशन शौर्य’ची आठवणयावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील मिशन शौर्य या उपक्रमाचा संदर्भ दिला. ठासून गुणवत्ता असल्यामुळे संधी मिळाली तर ज्यांनी आयुष्यात विमान पाहिले नाही, असे चंद्रपूरच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थी विमानाएवढ्या उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टला गाठू शकले. त्यामुळे अशक्य काही नसते. माझी खात्री आहे की, चंद्रपूरच्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक हिरे आहेत. या हिऱ्यांना फक्त पैलू पाडण्याची गरज आहे. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वाणीतून व्यक्त झालेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला आयुष्यामध्ये लक्षात ठेवण्याचे आवाहनही केले.