चंद्रपूरची मुलगी जागतिक स्पर्धेत होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:33 IST2021-09-14T04:33:24+5:302021-09-14T04:33:24+5:30

चंद्रपूर : इंटरनॅशनल ग्लाॅमर प्रोजेक्टद्वारा आयोजित मिसेस इंडिया स्पर्धेत चंद्रपूरचे अरुण चिंतलवार व लता चिंतलवार यांची मुलगी शिल्पाने बाजी ...

Chandrapur's daughter will participate in the world competition | चंद्रपूरची मुलगी जागतिक स्पर्धेत होणार सहभागी

चंद्रपूरची मुलगी जागतिक स्पर्धेत होणार सहभागी

चंद्रपूर : इंटरनॅशनल ग्लाॅमर प्रोजेक्टद्वारा आयोजित मिसेस इंडिया स्पर्धेत चंद्रपूरचे अरुण चिंतलवार व लता चिंतलवार यांची मुलगी शिल्पाने बाजी मारली असून ती प्रथम आली आहे. आता जागतिक स्पर्धेत ती भारताचे नेतृत्व करणार आहे.

सोलापूरचे सासर असलेल्या शिल्पा मिलिंद आडेम ही मिस इंडिया स्पर्धेत प्रथम आली. ही स्पर्धा मुंबई येथील पंचतारांकित हाॅटेलमध्ये पार पडली. देशभरातून हजारोंच्या संख्येतून निवड झालेल्या ४७ स्पर्धकांतून पाच जणांची निवड झाली आहे. यामध्ये ती पहिली आली. शिल्पा मिलिंद आडेम ही सोलापूरचे वकील गौरीशंकर आडेम यांची सून आहे. तिची निवड झाल्याबद्दल चंद्रपूर पद्मशाली समाजाचे चंद्रपूर अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर अल्लेवार, उपाध्यक्ष रमेश दुब्बावार, जिल्हाध्यक्ष डॉ. बंडू आकनुरवार, जिल्हा सचिव

रमेश यंगलवार यांनी तिचे कौतुक केले आहे.

Web Title: Chandrapur's daughter will participate in the world competition