शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चंद्रपूरचे भूमिपुत्र उलगडणार सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे तथ्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:50 IST

Chandrapur : निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी यांच्याकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची जबाबदारी

राजेश मडावी लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : २६/११ मुंबई बॉम्बस्फोटातील अतिरेकी अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी यांच्याकडे मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची जबाबदारी देऊन फडणवीस सरकारने पुन्हा एकदा चंद्रपूरच्या भूमिपुत्रावर विश्वास टाकला आहे. २०१५ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची राज्याच्या लोकायुक्तपदी नियुक्त झाली होती. या पदावरूनही त्यांनी निष्पक्ष न्याय दिल्याच्या अनेक आठवणी आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी हे मूल येथील रहिवासी आहेत. त्यांचा कौटुंबिक गोतावळा याच शहरात राहून विविध क्षेत्रांत विधायक योगदान देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विद्यार्थी जीवन याच शहरात गेले. मुख्यमंत्र्यांच्या काकू व माजी राज्यमंत्री शोभाताई फडणवीस यांचे मूल हे कार्यक्षेत्र हे विशेष. निवृत्त न्यायाधीश टहलियानी यांनी गोंदिया येथून एलएलबी झाल्यानंतर प्रारंभी अॅड. दादा देशकर यांच्या मार्गदर्शनात वकिली सुरू केली. १९७९ च्या सुमारास गडचिरोली, सिरोंचा, देसाईगंज व वरोरा येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत होते.

५० रुपयांत दिला न्याय २०१५ मध्ये चंद्रपूरचे एक मुख्याध्यापक अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या पत्नीने तत्कालीन सीईओंकडे आर्थिक मोबदला व निवृत्तीवेतनाचा दावा दाखल केला. मात्र 'या प्रकरणात भारतात कुठेही न्याय मिळणार नाही' असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने ती हादरली. अखेर सर्व कागदपत्रे घेऊन मूल येथे न्यायाधीश बंधूंच्या घरी गेली. ती कागदपत्रे लोकायुक्तांकडे पोस्टाने केवळ ५० रुपयांत लोकायुक्तांकडे पाठवली. अखेर २० दिवसांतच निकाल दिला. मुख्याध्यापकांच्या पत्नीला १३ लाखांचा मोबदला मिळाला. आता १३ हजार रुपये पेन्शन मिळत आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSantosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराड