चंद्रपूर प्लास्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:28 IST2018-06-03T23:28:01+5:302018-06-03T23:28:17+5:30

कौशल्ययुक्त भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास व मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या केमिकल आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयांतर्गत रसायनिक खते विभागाच्या सिपेट या संस्थेने चंद्रपूर शहरात आतापर्यंत सतराशे मुलांना नोकरी देऊन प्रसंशनीय काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख लवकरच महाराष्ट्रातील प्लास्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणारी नगरी म्हणून होणार असल्याचा आपणास विश्वास असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.

Chandrapur will provide human resources to the plastic industry | चंद्रपूर प्लास्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणार

चंद्रपूर प्लास्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणार

ठळक मुद्देहंसराज अहीर : सिपेटमार्फत वर्षभरात १७०० मुलांना महानगरांमध्ये नोकरी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कौशल्ययुक्त भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास व मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या केमिकल आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयांतर्गत रसायनिक खते विभागाच्या सिपेट या संस्थेने चंद्रपूर शहरात आतापर्यंत सतराशे मुलांना नोकरी देऊन प्रसंशनीय काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख लवकरच महाराष्ट्रातील प्लास्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणारी नगरी म्हणून होणार असल्याचा आपणास विश्वास असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.
चंद्रपुरात केंद्रिय केमिकल अ‍ॅन्ड पेट्रोकेमिकल मंत्रालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या सिपेट या कॉलेजमार्फत ‘प्लेसमेंट’ करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने २०१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सीपेटच्या अभ्यासक्रमाला चंद्रपूरमध्ये सुरुवात करण्यात आली. संपूर्ण भारतात ३१ शहरांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू असून महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि चंद्रपूर या दोन शहरांमध्ये सिपेटच्या मार्फत प्रशिक्षण दिले जाते. सहा महिन्यांचा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. २०१४ पासून आतापर्यंत चंद्रपूरच्या सिपेट या संस्थेमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना पुणे आणि मुंबई येथे टाटा, पॉलिमर एलजी, इंदोर कंपोझिट आदी प्लॉस्टिक कंपन्यांमध्ये नोकरी देण्यात आली आहे. ही सर्व मुले प्लास्टीक प्रोसेसिंग मशीन आॅपरेटर म्हणून या कंपन्यांमध्ये रुजू झाली असून त्यांना प्रमाणपत्र भेटल्यानंतर लगेच नोकरी मिळाली आहे. या सर्वांचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी काल स्थानिक एका हॉटेलमध्ये प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, राहुल सराफ, खुशाल बोंडे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना संबोधित करताना ना. हंसराज अहीर यांनी चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त जिल्हा बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे जाहीर केले. त्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून वेगवेगळ्या संस्थांना या ठिकाणी आणण्याचा आमचा संकल्प असल्याचे स्पष्ट केले. या संस्थेसाठी एक अद्यावत इमारत लवकरच उभारली जाणार आहे.

Web Title: Chandrapur will provide human resources to the plastic industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.