पर्यटनातून रोजगार देणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:24 IST2021-02-20T05:24:53+5:302021-02-20T05:24:53+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील गर्द जंगल आणि विपुल प्राणिविश्व अनुभवण्याची संधी वनविभागाने दिली आहे. त्यामुळे आता भद्रावती परिक्षेत्रातील चोरा - ...

पर्यटनातून रोजगार देणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख व्हावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील गर्द जंगल आणि विपुल प्राणिविश्व अनुभवण्याची संधी वनविभागाने दिली आहे. त्यामुळे आता भद्रावती परिक्षेत्रातील चोरा - तिरवंजा या ठिकाणी जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे. या माध्यमांतून पर्यटनातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होण्यास चालना मिळणार आहे. येत्या काळात चंद्रपूरची ओळख प्रदूषित व उद्योग धंद्याकरिताच न राहता पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार देणारा जिल्हा अशी व्हावी, असे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. भद्रावती परिक्षेत्रातील चोरा - तिरवंजा सफारी पर्यटन रस्त्याच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या.
यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्य वनसंरक्षक एन, आर. प्रवीण, विभागीय वन अधिकारी सारिका जगताप, विभागीय वन अधिकारी धोत्रे, तहसीलदार शिंतोडे, जि. प. सदस्य मारोती गायकवाड, सह वनरक्षक लखमावर, संकलन अधिकारी चोपडे, पं. स. सदस्य महेश टोंगे, सरपंच संगीता खिरटकर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास, वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड, अनिल बावणे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्याची ओळख संपूर्ण जगात ताडोबा अभयारण्याच्या माध्यमातून आहे. ताडोबामुळे परिसरातील नागरिकांच्या हाताला काम मिळाले. त्याचप्रमाणे या सफारीच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना व विशेषतः युवकांना रोजगार निर्मिती होणार आहे. वनविभागाने जिल्ह्यात अशाच प्रकारे पर्यटनाला चालना देण्याकरिता नवनवीन उपक्रम राबवावे, असे आवाहनही आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.